Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाच्या युवक प्रदेश सरचिटणीस पदी चेतन गायकवाड यांची निवड

 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाच्या युवक प्रदेश सरचिटणीस पदी चेतन गायकवाड यांची निवड

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाच्या युवक प्रदेश सरचिटणीस पदी चेतन नागेश अण्णा गायकवाड यांचे निवड करण्यात आली पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई येथील राष्ट्रवादी कार्यालय येथे नियुक्तीपत्र देण्यात आले या निवडीबद्दल चेतन गायकवाड यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात आले आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत गेल्या पाच वर्षापासून चेतन गायकवाड हे राजकारण व समाजकारण मध्ये सक्रिय आहेत आपले वडील नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड यांचा वारसा घेऊन ते मार्गक्रमण करीत आहेत. युवकांची मोठी फळी चेतन गायकवाड यांच्यासोबत आहे अत्यंत मितभाषी संयमी अशा या युवा नेतृत्वाकडे अजित पवार गटाकडून युवक प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. दरम्यान राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस पदी चेतन गायकवाड यांची निवड झाली या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड,माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी, सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे माजी सभापती आनंद मुस्तारे, प्रांतिक सदस्य महेश निकंबे,पंढरपूरचे फारुकभाई बागवान आदींच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले या निवडीबद्दल चेतन गायकवाड यांचे सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या निवडीबद्दल सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे,मोहोळ मतदार संघाचे आमदार यशवंत तात्या माने, करमाळा मतदार संघाचे आमदार संजय शिंदे, मोहोळ चे माजी आमदार राजन पाटील मालक,अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपक आबा साळुंखे, सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार यांनी या निवडीबद्दल भ्रमणध्वनीद्वारे चेतन गायकवाड यांचे अभिनंदन करत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Reactions

Post a Comment

0 Comments