छत्रपती शिवराय विज्ञानवादी होते- शिवव्याख्याते डाॅ. सतिश कदम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज पाच शह्यांच्या विरोधात अनेक लढाया लडले कोणताही मोहर्त पाहत नव्हते. फेब्रुवारी महिन्यात आपल्या प्रमुखांची पत्नी मरण पावलेली असताना सुध्दा जून महिन्यात राज्याभिषेक सोहळा आयोजित करून छत्रपती शिवराय हे विज्ञानवादी असल्याचे शिवव्याख्याते डाॅ. सतिश कदम यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकार कार्यालय, सोलापूर व दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सोलापूर ग्रंथोत्सव 2023 कार्यक्रमातील शिवचरित्र आणि शिवराज्याभिषेक हे दुसरे विचारपुष्प गुंफताना कदम हे बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली महाराष्ट्र गीत व स्वामी रंगनाथन यांच्या प्रतिमेपूजन आणि दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली. छत्रपती शिवरायांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर पुढे बोलताना कदम म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी रायगडच का राजधानी केली, राजगड का केला नाही. बाजीप्रभूंनी खिंड कशी लढविली ती त्या जागेवर जाऊन बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर शिव काशिद मरणाच्या दारात हासत हासत का गेले. छत्रपती शिवराय हे कुटुंबियांसाठी न जगता रयतेसाठी कसे जगले यावर विस्तृत मांडणी केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तज्ञ संचालक प्राचार्य सी बी गंभीर तर दयानंद महाविद्यालय शिक्षण शास्त्रचे प्राचार्य श्रीरंग क्षीरसागर, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय प्राचार्य विजयकुमार उबाळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर संतोष जाधव सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, संघाचे कार्यवाहक साहेबराव शिंदे, उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी नीटनेटका करण्याचे काम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर येथील सहाय्यक प्रदीप गाडे, महेश कुलकर्णी, जगदीश परमशेट्टी, ज्योतीराम चांगभले व नरसिंह मिसालोलू यांनी अथक परिश्रम घेतली.

0 Comments