भाजप नेत्यांना त्या पोस्टमध्ये वसूली टायटन्स असं म्हटलं - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, March 30, 2024

भाजप नेत्यांना त्या पोस्टमध्ये वसूली टायटन्स असं म्हटलं

  भाजप नेत्यांना त्या पोस्टमध्ये वसूली टायटन्स असं म्हटलं

 

दिल्ली (वृत्तसेवा ):-भारतीय महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकरच्या एका पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. पूजा वस्त्राकर हिच्या इन्स्टाग्रामवर नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजप नेत्यांबद्दल एक पोस्ट करण्यात आलेली होती.

ही पोस्ट डिलिट करत पूजाने माफीही मागितली. पण पूजा वस्त्रकर हिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पूजा वस्त्रकर हिने शुक्रवारी इन्स्टाग्रामवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि इतर भाजप नेत्याची खिल्ली उडवणारी पोस्ट केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेत्यांचा फोटो पोस्ट करत वसूली टायटन्स असं टायटलही दिले होते. पूजाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. अनेकांनी या पोस्टवर आपली मतं नोंदवली, काहींनी पूजाला जोरदार ट्रोल केले. त्यानंतर पूजाने ही पोस्ट डिलिट करत माफीही मागितली. त्याशिवाय या पोस्टबाबत तिने स्पष्टीकरणही दिले.


पूजा वस्त्रकार हिने नेमकी पोस्ट काय केली ?

अष्टपैलू पूजा वस्त्रकार (Pooja Vastrakar) भारतीय महिला क्रिकेट संघातील महत्वाची सदस्य आहे. पूजाच्या इन्स्टाग्राम खात्यावरुन शुक्रवारी मोदी आणि भाजपची खिल्ली उडवणारी पोस्ट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांना त्या पोस्टमध्ये वसूली टायटन्स असं म्हटलं गेले. त्याशिवाय ईडी इम्पॅक्ट प्लेअर असल्याचेही टाकण्यात आले. या पोस्टनंतर पूजावर टीकेचा भडीमार झाला. पूजाने तात्काळ ही पोस्ट डिलिट केली, त्याशिवाय स्पष्टीकरणही दिले. पण तोपर्यंत ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages