तालुक्यात भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता येत्या आठ दिवसांत या अपूर्ण योजना पूर्ण करून गावात पाणीपुरवठा सुरू करावा- आ.यशवंत माने
मोहोळ(कटूसत्यवृत्त):-शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत ५५ तालुक्यात ग्रामपंचायतींमध्ये पाणीपुरवठा विहीर व पाइपलाइनची कामे देण्यात आली आहेत; परंतु कामाची मुदत संपली तरी काही गावे वगळता इतर ग्रामपंचायतींची कामे अपूर्ण आहेत. तालुक्यात भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता येत्या आठ दिवसांत या अपूर्ण योजना पूर्ण करून गावात पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा जे काम करणार नाहीत ते कोण जवळचा कोण लांबचा न पाहता कोणीही असो त्या ठेकेदारास ब्लॅक लिस्टमध्ये टाकून दंडात्मक कारवाई करण्याची सूचना आमदार यशवंत माने यांनी केली. तालुक्यात भविष्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाई व जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व ठेकेदार यांची तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी आढावा घेत काम अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांविरोधात सूचना केल्या.या बैठकीला गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी सुनील कटकधोंड, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता वसीम शेख, संतोष ननवरे, जयवंत गुंड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, दूध संघाचे व्हा. चेअरमन दीपक माळी आणि गावोगावचे सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदार उपस्थित होते.मोहोळ तालुक्यामध्ये मागील वर्षामध्ये शहराची व तालुक्याची पाणीटंचाई लक्षात घेता शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत तालुक्यातील ५५ गावांमध्ये या योजना मंजूर केल्या आहेत; परंतु एक वर्ष उलटून गेले तरीही बोटावर मोजण्या इतपतच गावातील या योजना पूर्ण असून, अन्य ठिकाणच्या योजना रेंगाळलेल्या आहेत यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडल्याने मार्चच्या पहिल्यआठवड्यापासूनच शहरासह तालुक्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. भविष्यातील पाणीटंचाईच आढावा घेण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून त्या ५५ गावच्या सरपंच, उपसरपंच व संबंधित ठेकेदाराची तातडीची बैठक पंचायत समितीमध्ये बोलावली होती.
ग्रामसेवकावर कारवाई केल्याचे म्हणणे मागितले

0 Comments