Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा व तालुका महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी

 मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा व तालुका महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा व तालुका महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या असून या नूतन पदाधिकाऱ्यांना आमदार यशवंत माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा वर्षाराणी शिंदे, जिल्हा कार्याध्यक्षा ज्योत्स्ना पाटील, उत्तर सोलापूर कार्याध्यक्षा उज्ज्वला पाटील, संतोष ननवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, उपाध्यक्ष हेमंत गरड, जयवंत गुंड उपस्थित होते. नूतन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्षा कल्पना खंदारे, उपाध्यक्षा नगरबाई चवरे, जिल्हा सचिव कामिनी चोरमले, जिल्हा सहसचिव रशिदा शेख, चिटणीस सिंधुताई वाघमारे, सरचिटणीस संगीता पवार, मोहोळ तालुकाध्यक्ष शुभांगी लंबे, मोहोळ शहरअध्यक्षा यशोदा कांबळे, मोहोळ तालुका कार्याध्यक्ष स्मिता कोकणे, उत्तर सोलापूर तालुका कार्याध्यक्षा विजया सावंत, मोहोळ तालुका कार्याध्यक्षा सुरेखा बाबर, उत्तर सोलापूर तालुका उपाध्यक्षा नयना तोडकरी, लक्ष्मी हांडे यांच्या निवडी करण्यात आल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments