मोहोळ मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार- बाळराजे पाटील
मोहोळ(कटूसत्यवृत्त):-मोहोळ मतदारसंघातील हरितक्रांतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून शेकडो कोटींचा निधी आणून आष्टी आणि शिरापूर उपसा जलसिंचन योजनेच्या पूर्णत्वासाठी निधी आजवर कमी पडू दिला नाही. विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता माझ्या मोहोळ मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर आणखी कोणकोणत्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी दिली.
वडाचीवाडी येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पाझर तलाव दुरुस्ती व खोलीकरण कामाचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोहोळ पं.स. कार्यकारी अभियंता पारसे, दत्ता पवार, बंडू डिकरे, अशोक बचुटे, रामेश्वर सुरवसे, बाळासाहेब डोंगरे, दत्ता डोंगरे,उमेश नाईकवाडी, अशोक पाटील, अरुण म्हमाणे, रत्नाकर नाईकनवरे, गणेश डोंगरे, गणेश म्हमाणे, सिद्धेश्वर चव्हाण, सिद्धेश्वर म्हमाणे, आप्पा नाईकनवरे उपस्थित होते.
मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातील रस्ते कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. याशिवाय विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना मधून पाणीपुरवठ्याचे प्रश्न मार्गी लागत आहेत. मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातील हजारो कार्यकर्ते अनगर येथे येऊन मूलभूत सुविधांच्या अडचणी मांडतात. ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी मतदारसंघातील निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी माजी आमदार राजन पाटील यांच्या संपर्कात गेल्या अनेक दशकापासून आहे. सर्वसामान्य जनतेचा तो विश्वास आणि विकासात्मक शब्द पर्ण करण्याची ती परंपरा या पुढील काळातही अबाधित राहील, असा मला विश्वास आहे. बाळराजे पाटील

0 Comments