Ads

Ads Area

जनसेवेसाठी राष्ट्रवादी शहर कार्यालय सोमवार पासून सज्ज...

 जनसेवेसाठी राष्ट्रवादी शहर कार्यालय सोमवार पासून सज्ज...

सोलापूर(कटूसत्यवृत्त):- रविवारी उपमुख्यमंञी अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते जुनी मिल कंपौंङ मुरारजी पेठ येथील राष्ट्रवादी शहर कार्यालयाचे उदघाटनानंतर सोमवारी शहर-जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष  जुबेर भाई बागवान यांनी प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली असून जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्या हस्ते शहर -जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांनी पदभाराची सूञे हाती घेतली.गुलाब देऊन जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांनी शहर-जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांचे स्वागत केले.शहर -जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्षांसह सर्वच फ्रंटल सेलच्या अध्यक्ष व कार्याध्यक्षांनी कामकाजाची सूञे स्विकारली.जनतेच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी हे राष्ट्रवादी भवन कार्यालय सकाळी १० ते दुपारी ५ वा.पर्यंत जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहे.तरी सोलापूरकरांनी आपल्या प्रश्नांबाबतीत आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शहर-जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांनी माध्यमांशी बोलताना केलै आहे....

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close