Hot Posts

6/recent/ticker-posts

जुळे सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी चेतन चौधरी.

 जुळे सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाच्या 

अध्यक्षपदी चेतन चौधरी. 

कार्याध्यक्षपदी सचिन गोडसे अरविंद शेळके

 तर खजिनदारपदी रवीकांत शिरगिरे 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- जुळे सोलापूर भागामध्ये 19 फेब्रुवारी शिवजयंती जल्लोषात साजरी केली जाणार असून जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयामध्ये जुळे सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती  सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या बैठकीत लोकशाही पद्धतीने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली

 मंडळाचे नूतन पदाधिकारी ची निवड पुढील प्रमाणे

 अध्यक्ष : चेतन चौधरी उपाध्यक्ष : रितिकांत कांबळे व लक्ष्मी माने सचिव : महेश गिराम कार्याध्यक्ष : सचिन गोडसे, अरविंद शेळके खजिनदार : रवी शिरगिरे प्रसिद्धीप्रमुख : सीताराम बाबर  यावेळी जुळे सोलापूर मध्यवर्तीचे प्रमुख विश्वस्त शाम कदम यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले.  जुळे सोलापूर भागामध्ये शिव विचारांची शिवजयंती साजरी करण्यासाठी मिलिंद भोसले विशाल गायकवाड अविनाश गोडसे महेश घाडगे लता ढेरे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून सूचना मांडल्या. 

 यावेळी दीपक डोके राजाभाऊ कुसेकर मिलिंद भोसले सुशांत वाघचौरे नामदेव पवार  महेश घाडगे विशाल गायकवाड नरेश घोरपडे निखिल भोसले बाळासाहेब फाळके लता ढेरे  माजी उत्सव अध्यक्ष रविकांत होणकोळे नागेश शिंदे महेश देवकर बसवराज आळंगे जिवेश सावंत अजय ढोरलू मल्लिकार्जुन हेलवे प्रशांत पवार अविनाश गोडसे  तेजस गायकवाड राजेंद्र जगदाळे मल्लिकार्जुन पिलगिरी विनायक पवार श्रीनिवास श्रावणे रमेश चव्हाण गजानन शिंदे रोहित तडवळकर ईश्वर काळजे ओंकार कदम आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments