Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ येथील ब्रिज खाली वाहनासाठी पार्किंगची सोय करण्यात यावी.

 मोहोळ येथील ब्रिज खाली वाहनासाठी पार्किंगची सोय करण्यात यावी.

मोहोळ(कटूसत्य वृत्त):- ग्राहक समिती महाराष्ट्र व चालक -मालक यांच्या वतीने मोहोळ येथील ब्रिज खाली वाहनासाठी पार्किंगची सोय करण्यात यावी. या साठी श्री छत्र पती शिवाजी  महाराज चौक मोहोळ तेथे "आमरण उपोषण करण्यात येणार होते. माननीय तहसीलदार मुळीक साहेब यांनी सर्व उपोषण कर्त्यांना बोलवून घेऊन तात्पुरता मार्ग काढण्याचे ठरले.

  बैठकीत सि.ई.ओ.डोके साहेब, पी. आय. राऊत साहेब, बी. डी. ओ. मिरगणे साहेब, ग्राहक समितीचे प्रदेश अध्यक्ष तानाजीराव गुंड, जिल्हा अध्यक्ष संतोष कोल्हाळ यांनी तात्पुरती कुरुल रोड, हॉटेल लोकसेवा समोर पार्किंग ची सोय करण्यात आली. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले. आमची ब्रिज खाली पार्किंगची सोय करण्याची मागणीसाठी शासन दरबारी रीतसर मागणी करून सर्वांनी मिळून मदत करण्याचे ठरले.

  यावेळी राजू सय्यद, अन्सार शेख, मुन्ना शिंदे, दया स्वामी, योगेश शिंदे, सिकंदर शेख, शाहीर शेख, योगेश फाळके इत्यादी पदाधीकारी, चालक -मालक कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments