छत्रपती केसरी चा बहुमान पंढरपूरच्या पै.तात्या जुमाळे यांने पटकविला.
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री शिव जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने डाळिंबी आड मैदान शिंदे चौक येथे भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित केले होते.प्रारंभी या कुस्ती मैदानाचे पूजन खलिफा दत्तात्रय कोलारकर ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे उत्सव अध्यक्ष सुभाष पवार चंद्रकांत काका वानकर राजन जाधव श्रीकांत घाडगे बापू जाधव भाऊसाहेब रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले.मैदानात लहान कुस्त्यासह शंभर रुपये पासून सुरुवात करण्यात आले.या मैदानात एक नंबरची प्रमुख **कुस्ती छत्रपती केसरी सोलापूर साठी पै.तात्या जुमाळे-पंढरपूर विरुद्ध पै.सुरज मुलाणी-खडुस या दोघांमध्ये झाली.यामध्ये पै.तात्या जुमाळे यांने पै.सुरज मुलाणीवर मात करून छत्रपती केसरी सोलापूर हा किताब मिळवला.पै.तात्या यास कै.पै.मुरलीधर घाडगे यांच्या स्मरणार्थ गदा व रोख रक्कम देण्यात आली.तसेच दोन नंबरची कुस्ती संभाजी राजे केसरी सोलापूर या किताबासाठी आंतरराष्ट्रीय पै. सौरभ इगवे-केगाव विरुद्ध राष्ट्रीय विजेता पै.महेश पाटील-कोल्हापूर यांच्यात लढत झाली.यामध्ये पै.सौरभ याने पै. महेश वर मात करून संभाजी राजे केसरी सोलापूर हा किताब मिळवला. सौरभ यास कै.पै.रामकृष्ण भाऊ वानकर यांच्या स्मरणार्थ गदा व रोख रक्कम देण्यात आली.तसेच तीन नंबरची कुस्ती पै.गणेश कलागते-भगवा आखाडा विरुद्ध पै.अमर माने- धाराशिव यामध्ये झाली.यामध्ये गणेश कलागते यांने गुणावर पै.अमर मानेवर विजय मिळविला.या मैदानात दीडशेहून अधिक कुस्त्या पार पडल्या. या मैदानात सोलापूर सह धाराशिव पुणे कोल्हापूर सांगली येथील पैलवान यांनी सहभाग नोंदविला.यावेळी प्रमुख मान्यवर मा.महेश आण्णा कोठे एपीआय पै.अजित पाटील साहेब मा.पुरुषोत्तम बरडे मा.दिलीप कोल्हे मा.संतोष पवार मा.चेतन नरुटे मा.मनिष देशमुख मा.श्रीकांत डांगे मा.बाळासाहेब पुणेकर मा.जयवंत सलगर मा.मुन्ना वानकर मा.अंबादास शेळके मा.सुशील बंदपट्टे मा.गणेश डोंगरे मा.मतिन बागवान मा.रवि मोहिते मा.विनोद भोसले पै.राजू परळकर मा.श्रीपाद रोडगे मा.बजरंग जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.या मैदानात पंच म्हणून प्रा.धनराज भुजबळ पै.अमर दुधाळ राष्ट्रीय विजेता पै.नितीन खुर्द मराठावाडा केसरी पै.आतिष मोरे पै.शिवाजी परळकर पै.महेश कोळी पै.आप्पा साखरे मा.वैजनाथ जाधव मा.विठ्ठल बंडगर पै.सुरज मोरे पै.समर्थ कदम पै.सागर मोरे पै.विठ्ठल कलागते पै.शाम भोसले पै.रोहित इगवे पै.किशन सरवदे पै.विजय दोरकर मा.युवराज शेळके मा.बाबा माळी यांनी पंच म्हणून काम पाहिले.तसेच हे मैदान यशस्वी करण्यासाठी पै.बापु जाधव पै.अमर दुधाळ देविदास घुले सचिन स्वामी बसु कोळी जलपेश घुले विनायक भोजरंगे पत्रकार वैभव गंगणे यांनी परिश्रम घेतले. अशोक धोत्रे सर यांनी कुस्ती निवेदकाचे काम पाहिले!


0 Comments