Ads

Ads Area

नारायणचिंचोली येथे माझी वसुंधरा अभियांनांतर्गत पर्यावरण पूरक घंटागाडीचा शुभारंभ..

 नारायणचिंचोली येथे माझी वसुंधरा अभियांनांतर्गत पर्यावरण पूरक घंटागाडीचा शुभारंभ..

 पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील नारायण चिंचोली येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचऱ्याचे विलगीकरण करून प्रकिया करणेसाठी पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक घंटा गाडीचा शुभारंभ   बुधवार दि. 07 फेब्रुवारी  2024 रोजी  पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक  लक्ष्मण तात्या धनवडे यांचे हस्ते संपन्न झाला . याच वेळी मोदी आवास योजना, रमाई आवास योजना  अंतर्गत पात्र घरकुल लाभार्थ्यांना आदेशाचे वाटप करण्यात आले.
 
 माझी वसुंधरा 4.0 अभियानांतर्गत भूमी,अग्नी, वायू, जल व आकाश या पाच तत्वांचे संवर्धन करण्यासाठी नारायण चिंचोली हे गाव  मोठ्या हिरारीने सहभागी आहे.  कचऱ्याचे व्यवस्थापन करून  ओला कचरा,सुका कचरा, प्लॅस्टिक कचरा विलगीकरण करण्यासाठी  पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक घंटागाडी सुरू केली आहे. ही घंटागाडी गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन कचऱ्याचे संकलन करेल. गोळा केलेला कचरा वाहतूक करून कचरा संकलन केंद्रात साठवला जाईल.सर्व ग्रामस्थांनी  आपल्या घरातील कचरा घंटागाडीला देऊन कचरामुक्त गाव करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. ग्रामपंचायतच्या या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत केले. सूर्यनारायण देवाच्या पदस्पर्शाने   पावन झालेल्या नारायण चिंचोली गावामध्ये देवाचे सुप्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर आहे. देवाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातून लाखो भाविक मोठ्या भक्ती भावाने येतात. भाविकांच्या व गावातील नागरिकांच्या  सोयीसाठी  नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी  ग्रामपंचायत नारायणचिंचोली सदैव प्रयत्नशील असते.
        
 यावेळी सरपंच सौ.नर्मदाताई धनवडे, उपसरपंच गहिनीनाथ तात्या चव्हाण, ग्रामसेवक संतोष गायकवाड, .विठ्ठल माने,नितीन मस्के, धर्मराज नलवडे,शिवाजी भोसले, बळीराम बनसोडे,सौदागर गुंड,हनुमंत गुंड,सुनील माने,अमोल वसेकर , विष्णू माने,शिवाजी वसेकर,विजय कोळेकर, ,ज्ञानेश्वर मस्के, पोपट पाटील, औदुंबर बनसोडे, नारायण गुंड ,बापू वसेकर,नितीन घाडगे, सज्जन हाडमोडे, संदीप हिंगमिरे,पप्पू वाघमोडे, मुकुंद घाडगे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close