Ads

Ads Area

नेताजी इंग्लिश मिडीयम शाळेत किल्ला स्पर्धा

 नेताजी इंग्लिश मिडीयम शाळेत किल्ला स्पर्धा 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त किल्ला बांधणी स्पर्धा घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी तोरणा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, शिवनेरी, रायगड, प्रतापगड , जंजिरा, सज्जनगड, सिंहगड अशा वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले बनवले.या किल्ल्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. मुले खूप आनंदाने या स्पर्धेत सहभाग घेतले. किल्ल्याची सजावट केले. किल्ल्यामध्ये जिवंतपणा उतरवण्याचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर प्रयत्न केला.स्पर्धक मुले प्रत्येक किल्ल्याबद्दल माहिती सांगत होते.या उपक्रमात दुसरी ते  आठवीपर्यंतच्या  विद्यार्थ्यांनी स्वयं प्रेरणेने सहभाग घेतले होते. मोहित सिरसुल्ल,निहारिका अरकेल, आदित्य सुतार, अंजली मैले, रौनक कलगते,आराध्या जमादार, भूमिका पानिभाते, रामचरण बुरा, ऋषिकेश वंनंम, श्रीधर बत्तुल, प्रणव कोकुल या विद्यार्थ्यांनी १३ किल्ले बनविले. विद्यार्थ्यांनी किल्ले बनवण्यासाठी माती, विटा, चुना, रंग, पाणी यांचा वापर केला. विद्यार्थ्यांनी स्वकल्पनेतून किल्ले बनवले. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार व माध्यमिक प्रशालेचे शिक्षक प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. परिक्षक म्हणून भारती पाटील व जगदेव गवसने यांनी काम पाहिले.  पहिली ते चौथी वर्गाच्या गटातून रौनक कलागते (प्रथम ), आदित्य सुतार( द्वितीय), मोहित सिरसुल्ला व प्रांजल बनसोडे (तृतीय) क्रमांक मिळविले. पाचवी ते आठवी वर्गाच्या गटातून रामचरण बूरा(प्रथम), प्रणव कोक्कुल (द्वितीय), श्वेता पिडगुंडे व श्रीधर बत्तूल(तृतीय) क्रमांक पटकाविले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना किल्ले कसे बनवितात तसेच शिवाजी महाराजांचे जन्मस्थान , धाडसी व्यक्तीमत्व ,जीवन कार्य व ऐतिहासिक माहिती समजण्यास मदत झाल्याचे मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार यांनी सांगितले.  उपक्रम यशस्वी होण्यासाठी  इंग्लिश मिडीयम शाळेतील शिक्षिका तेजस्विनी जोगीपेटकर, सुजाता कुंभार, किरण कदम,प्रियंका खिलारे, अश्विनी गंगुल,कावेरी स्वामी, गायत्री परकीपंडला आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close