Ads

Ads Area

अखेर सत्याचा विजय....! होटगी स्टेशनचे सरपंच जगन्नाथ गायकवाड यांना न्यायदेवतेने दिला दिलासा.....!!

 अखेर   सत्याचा   विजय....! 

होटगी स्टेशनचे सरपंच  जगन्नाथ गायकवाड यांना न्यायदेवतेने दिला दिलासा.....!! 


सोलापूर (कटू सत्य वृत्त): -"सत्य परेशान होता है,  लेकिन पराजित नही...!   या विचार सूत्रानुसार गेल्या अनेक वर्षापासून दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी स्टेशन या गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील असणारे आणि सर्वांना एकत्र घेऊन विकास करणारे लोकप्रिय सरपंच म्हणून जगन्नाथ गायकवाड यांनी आपली ओळख निर्माण केली. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून त्यांच्या कल्याणासाठी कायमस्वरूपी त्यांचा आवाज बनून आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये सातत्याने सहभागी होणारर सरपंच म्हणून जगन्नाथ गायकवाड काम करत असताना त्यांना तीन अपत्य  आहेत.  त्यामुळे ते सरपंच पदावर राहण्यास अपात्र आहेत. अशा आशयाची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कृष्णानंद कोकरे यांनी दिली होती. 

या तक्रारीमध्ये सरपंच जगन्नाथ गायकवाड यांना 2001 च्या अगोदर दोन व त्यानंतर एक अशी एकूण तीन अपत्य आहेत .व  तीन अपत्य असल्यामुळे ते सरपंच पदावर राहण्यास कायद्यानुसार अपात्र आहेत. अशा आशयाची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्यानंतर" दूध का दूध आणि पाणी का पाणी"  याप्रमाणे न्यायदेवतेच्या मंदिरात वकिलांनी युक्तीवाद केल्यानंतर सरपंचांना तीन अपत्य असणारी बाब खरी आहे, परंतु त्यापैकी 1994 मध्ये जन्मलेले मुल हे 2019 साली मृत झालेले आहे. त्यामुळे वास्तविक पाहता या तक्रारीमध्ये तथ्य नव्हते.  तरीही कर्तव्यदक्ष सरपंच जगन्नाथ गायकवाड यांनी न्याय मंदिरामध्ये न्याय मागितला . कारण निवडणूक नामनिर्देशन पत्रामध्ये फक्त हयात असलेल्या मुलांची संख्या विचारली जाते. 

त्याशिवाय ग्रामपंचायत अधिनियम कलम 14 (1)ज 1 मध्ये नमूद केलेल्या भाषेचा अर्थ पडताळून पाहिल्या नंतर तो फक्त हयात असलेल्या मुलांची संख्या विचारात घ्यावी असा होत असल्यामुळेच न्यायदेवतेने सरपंच जगन्नाथ गायकवाड यांच्या बाजूने निकाल देत सत्याचा विजय करून दिला. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या काही महत्त्वाचे न्याय निवडण्याचा उल्लेख केला असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या तक्रारीची ताबडतोब दखल घेत तक्रारदाराने केलेली तक्रार फेटाळून लावली. त्यामुळे खऱ्या अर्थाने न्यायदेवतेमुळे सत्याचा विजय झाल्याची भावना जगन्नाथ गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केल्या जात असून कार्यकर्त्यांनी सरपंच जगन्नाथ गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

आपल्या देशामध्ये लोकशाहीनुसार कारभार केला जात असताना न्यायदेवतेवर विश्वास ठेवून संपूर्ण देश चालवला जातो.  त्यानुसारच  पोरगी स्टेशनचे कर्तव्यदक्ष सरपंच जगन्नाथ गायकवाड यांनाही न्यायदेवतेच्या मंदिरात योग्य आणि सत्य न्याय मिळाल्यामुळे सरपंच जगन्नाथ गायकवाड यांनी  यापुढे जनतेची सेवा करत राहू आणि सत्याच्या मार्गाने सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी उभा राहू अशी ग्वाही दिली आहे. 

यामध्ये तक्रारदाराकडून अँड.  विजय मराठे, आणि सरपंचाकडून अँड.  मंजुनाथ कक्कळमेली  यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close