Hot Posts

6/recent/ticker-posts

आमदार यशवंत माने यांनी अपघातग्रस्ताला दिला मदतीचा हात....! तात्या मिळेल तुम्हाला पुन्हा एकदा मतदारांची साथ.... !!

 आमदार यशवंत माने यांनी अपघातग्रस्ताला दिला मदतीचा हात....! 

तात्या मिळेल तुम्हाला पुन्हा एकदा मतदारांची साथ.... !! 

मोहोळ (दादासाहेब नीळ): -साधी राहणी आणि उच्च विचार हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून मोहोळ मतदार संघ आणि या मतदारसंघातील जनता हेच आपलं दैवत आहे अशी खुणगाठ मनाशी बांधून  प्रत्येक माणसाला आणि तालुक्याला विकासाच्या धाग्यात बांधणारे आणि सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे  आमदार ... अशी ओळख मोहोळ मतदार संघाचे आमदार यशवंत माने यांनी निर्माण केली आहे. सध्याच्या धकाधकीच्या आणि फॅशनेबल युगामध्ये सर्वसामान्य माणसाच्या जीवनाकडे लक्ष न देता फक्त मोठमोठी लांबलचक भासणे करून कृती मात्र शून्य असणारी माणसं आपण भरपूर पाहतो... 

फक्त पोपटासारखी गोड बोलणारी माणसं पायली ला पन्नास दिसतात.  परंतु  सर्वसामान्य माणसांसाठी आपला वेळ आणि आपली गाडी देणारी माणसं आपल्याला क्वचितच दिसतात. अहो पण असा एक माणूस नव्हे तर मोहोळ तालुक्याचे आमदार म्हणून कार्यरत असणारे विद्यमान आमदार यशवंत माने अनगर मधून मोहोळ कडे प्रवास करत असताना खंडोबाची वाडी या रस्त्यावर एक व्यक्ती अपघातात जखमी झाल्याचे दिसून आले. 

त्या जखमी व्यक्तीला तात्काळ स्वतःच्या गाडीमध्ये जागा देऊन ताबडतोब मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करून आमदार यशवंत माने यांनी आपल्या स्वतःच्या दौऱ्यात बदल करून माणुसकी आणि आपुलकीचा दाखवलेला हा ओलावा निश्चितच प्रत्येकासाठी प्रेरणा देणारा ठरला. अपघातात जखमी झालेले अंबादास माळी यांना आपल्यासाठी स्वतःची गाडी आणि वेळ खर्च करणारा घरातील कोणी नसलं तरी मोहोळ तालुक्याचा आमदार म्हणजे यशवंत तात्या हे आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य असल्याची जाणीव या निमित्ताने अंबादास माळी यांना झालीय. 

आमदार साहेबांच्या या मानवतेच्या ओलाव्यामुळे तालुक्यातील जनता तात्या तुमच्या साधेपणातच,  तुमचं मोठेपण दडले आहे. तात्या तुमचं कार्य लय भारी, तात्या पुन्हा एकदा,  तुम्हीच मारणार विधानसभेचे सवारी...!अशा प्रतिक्रिया सध्या मोहोळ मतदार संघामध्ये उमटू लागल्या आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments