सातव्या वेतनातील रोखीचा फरक लवकरच देऊ ः उच्च शिक्षण संचालक देवळाणकर_ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अधिवेशन उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 2, 2024

सातव्या वेतनातील रोखीचा फरक लवकरच देऊ ः उच्च शिक्षण संचालक देवळाणकर_ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अधिवेशन उत्साहात

 सातव्या वेतनातील रोखीचा फरक लवकरच देऊ

 ः उच्च शिक्षण संचालक देवळाणकर_

 महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अधिवेशन उत्साहात

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- राज्यातील ज्या वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनातील रोखीचा फरक द्यायचा राहिला आहे. त्यांना तो येत्या १५फेब्रुवारीपर्यंत देण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली.

        रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील द.ग. तटकरे महाविद्यालयात अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचे ४५वे वार्षिक अधिवेशन नुकतेच पार पडले. त्यावेळी देवळाणकर बोलत होते. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी आमदार  निरंजन डावखरे हे होते. याप्रसंगी कोकण विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ संजय जगताप, माणगाव शिक्षण प्रसारक  मंडळाचे अध्यक्ष राजू साबळे, ऑल इंडिया फेडरेशनचे नारायण शहा, महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा बढे, तटकरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एम. खामकर, जे. बी. सावंत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 स्वागत व प्रास्ताविक शिक्षकेतर कर्मचारी संघाचे जनरल सेक्रेटरी डॉ. आर. बी. सिंह यांनी करून महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ देवळाणकर यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनातील फरक रोखीने लवकर देण्याबरोबरच 10.20.30.चा प्रश्न आणि  ३०हजार शिक्षकेतर महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची लवकरच भरती प्रक्रिया राबविण्यात असल्याचे सांगितले

या अधिवेशनास सोलापूर कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, सचिव राजेंद्र गिड्डे, खजिनदार राहुल खराडे, सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य सिद्धेश्वर स्वामी, चंद्रकांत खानापुरे, चिदानंद स्वामी यांच्यासह राज्यभरातून आलेले महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages