अंतरीम अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया
10 वर्षाच्या कालावधी मध्ये मोदी सरकारने केलेल्या कामाचा योजनाचा व त्यावर केलेल्या खर्चाचा लेखा जोखा मांडला.
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्च़र,
मा. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मांडलेला अंतरीम अर्थ संकल्प़ म्हणजे मोदी सरकारने केलेल्या कार्याचे प्रगती पुस्त़क सादर केले. त्यांनी देशाच्या आर्थिक व सुधारणा, पायाभुत सुविधा, आरोग्य़ शिक्षण, शेती, रोजगार योजना, लघु व मध्यम़ व्यापारी व उद्योजक, तसेच गरीबांचे कल्याण, महिला बचत गट, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, रस्ते, रेल्वे, विमान, skill india, make in India, Startup India, पर्यटन, आदी बाबतीत केलेल्या कामाचा आढावा त्यांनी मांडला बहुचर्चीत GST, एक देश एक मार्केट व एक टॅक्स़ ही संकल्पना सत्यात उतरली,याचा विशेष उल्लेख आपल्या भाषणात केला. तसेच आयकर रिर्टन भरणाऱ्या लोकांमध्ये 2.4 पटीने वाढ झाली या बाबी त्यांनी नमुद केल्या, तसेच प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रायोजना, सोलार योजना, तरतुदीच्या आदी घोषणा केल्या. येणाऱ्या काळात रिफार्म, परफार्म आणि इन्स़फार्म अशापध्दतीने सरकार काम करणार आहे. याचा उल्लेख केला शिवाय विकसीत भारत ही संकल्प़ना यापुढे राबवण्यात येणार आहे. देशाच्या युवा लोकांना रोजगाराची मोठ्या प्रमाणात संधी होण्याकरीता नविन योजना साकार करणार आहे.
तेलबीया व तेल साठी धोरणा निश्चित केले. 40,000 रेल्वे बोगीचे वंदेभारत च्या दर्जात भविष्यात रुपांतर होणार आहे. पी. एम. गतीशक्ती व्दारे सुधारणा करुन रेल्वेप्रवास कमी खर्चात होणे करीता प्रयत्ऩ करणार आहे. कर रचने मध्ये कुठलाही बदल केलेला नाही. प्रत्यक्षकर, अप्रत्यक्षकर व custom या मध्ये no change आहे त्यांनी फक्त़ नविन आरकर कररचनेत सात लाख रुपये पर्यंत कुठलाही टॅक्स़ लागणार नाही. तसेच. कॉर्पोरेट टॅक्स़ 22% करण्यात आला आहे व काही नविन उत्पादन करणाऱ्या देशी कंपन्यांना 15% कर लागणार आहे. या शिवाय कुठल्याही प्रकारचे बदल करण्यात आला नाही.
अर्थ संकल्प़ काही तरतुदी खालील प्रमाणे
1. महात्मागांधी नॅशनल रोजगार ग्यारंटी योजना सन 2024-25 करीता 86,000cr. तरतुद करण्यात आली.
2. आयुष्यमान भारत स्कीम (प्रधानमंत्री जन आरोग्य़ योजना) सन 2024-25 करिता 7500cr. तरतुद करण्यात आली.
3. प्रोडक्शऩ लिंक इनसेटीव्ह़ स्कीम (PLI) करिता सन 2024-25 6200cr. तरतुद करण्यात आली.
4. सोलार पॉवर करिता 2024-25 8500cr. तरतुद करण्यात आली
5. नॅशनल ग्रीनाटाय योजना मिशन सन 2024-25 करीता 600cr. तरतुद करण्यात आली.
6. Ecosystem उत्पादनासाठी सन 2024-25 करिता 6903cr तरतुद करण्यात आली. या शिवाय संरक्षण मंत्रालयासाठी 6.2 कोटी, रोड एक्सपोर्ट व हायवे साठी 2.78 कोटी, रेल्वेमंत्रालयसाठी 2.55 कोटी आदी आदी मागण्या साठी आदी तरतुद जुलै 2024 पर्यंत करण्यात आली.
एकुण हा अंतरिम अर्थसंकल्प़ जो मांडला तो 10 वर्षाच्या कालावधी मध्ये मोदी सरकारने केलेल्या कामाचा योजनाचा व त्यावर केलेल्या खर्चाचा लेखा जोखा मांडला आहे. कुठलीही अतीशोयोक्ती त्यांनी अंतरीम अर्थसंकल्प़ात अर्थमंत्रांनी मांडली नाही. वास्तवीक येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकी पुर्वीचा अर्थसंकल्प़ असताना कुठल्याही घोषणा न करण्याचा मा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संयम दाखवीला व वास्तवीक लेखा अनुदान मांडला आम्ही सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड़ ॲग्रीकल्च़रच्या वतिने अध्यक्ष या अंतरिम अर्थसंकल्पाचे स्वागत करीत आहोत.
आपला राजु राठी अध्यक्ष

No comments:
Post a Comment