हुतात्मा स्मारकात ७५ वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 29, 2024

हुतात्मा स्मारकात ७५ वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा

 हुतात्मा स्मारकात ७५ वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात विस्तृत राज्यघटना आहे. त्याचप्रमाणे जगातील सर्वात श्रेष्ठ असे आपले संविधान असून सर्व नागरिकांनी संविधान वाचून व अभ्यासून आचारानात आणणे गरजेचे आहे. असे उदगार जेष्ठ विधीज्ञ ॲड. खतीब वकील यांनी काढले.ॲड.खतीब वकील हे हुतात्मा स्मारकात हुतात्मा सार्वजनिक वाचनालय व सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर यांच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा करताना अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 

याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, मी खूप भाग्यवान असल्याने हुतात्मा स्मारकात मला ध्वजवंदन करण्याचे भाग्य लाभले. प्रारंभी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यांच्या शुभहस्ते ध्वजावंदन करण्यात आले. 

यावेळी हुतात्मा सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, निवृत्त कृषी उपायुक्त आबासाहेब साबळे, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, खजिनदार प्रकाश शिंदे, संचालिका सौ सारिका मोरे, ग्रंथपाल वृषाली हजारे, लिपिक सारिका माडीकर, सेवक गीतांजली गंभीरे अनिस शहर शाखा प्रधान सचिव ब्रह्मानंद धडके, आरती एडके, इकबाल शेख, धनश्री साबळे श्वेता मोरे प्रथमेश बनसोडे ,निखिल पवार, प्रतीक नकाते,श्रीनिवास म्हंता, भास्कर कामोनी, दंतकाळे, शकुंतला सूर्यवंशी यांच्यासह बहुसंख्यवाचक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages