सोलापूर येथील सौ वृषाली हजारे आदर्श ग्रंथालय सेवक पुरस्काराने सन्मानित
सांगोला(कटूसत्य वृत्त):- हुतात्मा वाचनालय सोलापूर येथील ग्रंथपाल व जिल्हा संघाचे लिपिक सौ.वृषाली विवेक हजारे यांना पुणे विभागीय ग्रंथालय संघाच्या वतीने ग्रंथप्रेमी माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचा 2024 चा आदर्श ग्रंथालय सेवक पुरस्कार मा.आ.विनय कोरे ,कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णाताई वाईकर ,सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी इंगोले ,राज्य ग्रंथालय संघ अध्यक्ष ग्रंथमिञ डाॕ.गजानन कोटेवार , ग्रंथमिञ कुंडलिक मोरे, कोल्हापूर ग्रंथालय निरिक्षक शिंदे ,तांञिक सहाय्यक उत्तम कारंडे, ग्रंथमिञ सोपान पवार,ग्रंथमिञ हिंदुराव पाटील ,विभागाचे अध्यक्ष विजय कोलते ,कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय अध्यक्ष प्रा.सुशांत मगदूम प्रमुखकार्यवाह भिमराव पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघ , पुणे विभागीय ग्रंथालय संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रामीण ग्रंथालय राज्य पुरस्कार प्राप्त रसिक रंजन वाचनालय घुनकी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अधिवेशनामध्ये हा पुरस्कार घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी सांगोला तालुका ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष संजय सरगर ,कार्याध्यक्ष मच्छिंद्र मिसाळ ,औंदुबर काळे ,रणजित भगत , लक्ष्मण दिघे ,सुनिल इंगवले ,राजाभाऊ इंगोले ,अमर कुलकर्णी उपस्थित होते.

0 Comments