श्री विठ्ठल कारखान्याचे ८,७५,००० (कट्टे) साखर पोत्याचे पुजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 1, 2024

श्री विठ्ठल कारखान्याचे ८,७५,००० (कट्टे) साखर पोत्याचे पुजन

 श्री विठ्ठल कारखान्याचे ८,७५,००० (कट्टे) साखर पोत्याचे पुजन


वेणुनगर,(कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या सन २०२३ - २०२४ गळीत हंगामामध्ये उत्पादित झालेल्या ८,७५,००० (कट्टे) साखर पोत्याचे पुजन नवीन वर्षाचे औचित्य साधून सोमवार दिनांक ०१.०१.२०२४ रोजी कारखाना कार्यस्थळावर खासदार संजय (बंडू) जाधव परभणी व त्यांच्या पत्नी या उभयतांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन अभिजीतआबा पाटील व सर्व संचालक मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन अभिजीतआबा पाटील यांनी सर्व ऊस उत्पादक सभासद, ऊस पुरवठादार, अधिकारी, कर्मचारी, तोडणी वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे कॉन्ट्रॅक्टर, व्यापारी, हितचिंतक यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व यावेळी बोलताना ते म्हणाले की, सन २०२३ - २०२४ गळीत हंगामामध्ये ६१ दिवसामध्ये ४,६२,७२५ मे. टन ऊसाचे गाळप करुन ८,७५,००० (कट्टे) साखरेचे उत्पादन केले असून डिस्टीलरी व को-जन. प्रकल्पही पुर्ण क्षमतेने चालू आहेत. या कार्यक्रमासाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे, संचालक संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, जनक भोसले, सचिन वाघाटे, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सिताराम गवळी, अशोक जाधव, कलावती महादेव खटके, सविता विठ्ठल रणदिवे, तुकाराम मस्के सर, दशरथ जाधव, अशोक तोंडले, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, तानाजी बागल, सचिन शिंदे-पाटील, समाधान गाजरे, धनाजी खरात, उमेश मोरे, गणेश ननवरे कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड, तसेच एम. एस. सी. बँक प्रतिनिधी सी. एस. पाटील, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, व्यापारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages