Hot Posts

6/recent/ticker-posts

रणजितसिह शिंदे यांच्या हस्ते अजनसोंड ते बिटरगाव रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमिपूजन !

 रणजितसिह शिंदे यांच्या हस्ते  अजनसोंड ते बिटरगाव रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमिपूजन !


मौजे - अजनसोंड, (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर येथे ३०५४ योजनेअंतर्गत माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी मंजूर केलेल्या १५ लक्ष रुपयांच्या निधीतून अजनसोंड ते बिटरगाव रस्त्याच्या खडीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी रणजितसिह शिंदे यांनीउपस्थित राहून भूमिपूजन केले तसेच ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार करत सुसंवाद साधला. यावेळी ग्रामस्थांना शेतकऱ्यांना असलेल्या शाळा ,रस्ते , वीज, पाणी व इतर समस्या जाणून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सूचना दिल्या तर काही समस्या या टप्याटप्याने सोडवण्याचे आश्वासन दिले.


यावेळी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक पोपट (मामा) चव्हाण, माजी चेअरमन धोंडीबा डुबल, माजी सरपंच एकनाथ डुबल, माजी सरपंच दत्ता आप्पा घाडगे, परमेश्वर डुबल, संजय डुबल, श्रीराम डुबल, अरुण काका घाडगे, विश्वास घाडगे, दीपक घाडगे, शशिकांत शिरगिरे, तानाजी शिरगिरे, नागनाथ शिरगिरे, विकास घाडगे, चंद्रकांत घाडगे, वैजनाथ घाडगे, रामचंद्र कदम, आप्पासाहेब डुबल, विजय डुबल, प्रकाश डुबल, मेजर बंगाळे, बिटरगावचे सरपंच बाबुराव धुमाळ, हरिदास धनवे, केवळ राखुंडे, शिवाजी जाधव, त्रिंबक राखुंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments