प्रजासत्ताक संचलनात महिला अग्निवीरांच्या दोन तुकड्या होणार सहभागी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, January 9, 2024

प्रजासत्ताक संचलनात महिला अग्निवीरांच्या दोन तुकड्या होणार सहभागी

 प्रजासत्ताक संचलनात महिला अग्निवीरांच्या दोन तुकड्या होणार सहभागी

नवी दिल्ली(कटूसत्य वृत्त):- महिला अग्निवीर वायु सैनिक या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारतीय हवाई दलाच्या तुकडीमध्ये सहभागी होणार आहेत असे भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्याने सांगितले. सप्टेंबर २०२२ मध्ये भारतीय लष्करातील भरतीसाठी अग्निवीर योजना लागू करण्यात आली. त्यात भरती होणाऱ्या जवानांचा सेवा कालावधी केवळ चार वर्षांचाच आहे.त्यातील २५ टक्के जणांना पुढे नियमीत सेवेसाठी निवडले जाणार आहे. या जवानांना अग्निवीर म्हणून संबोधले जाते. लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये महिलांचाही अग्निवीर म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यातील संरक्षण दलाच्या दोन महिला तुकड्या यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये संचलन करणार आहेत.

यातील प्रत्येक तुकडीत १४४ महिला अग्निवीर असतील, ज्यात 60 लष्करातील आणि उर्वरित भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलातील असतील,” असे संरक्षण अधिकार्‍यांनी येथे सांगितले. 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे असतील.उल्लेखनीय म्हणजे, राष्ट्रीय राजधानीत येथे प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात फ्रान्सचे नेते सहाव्यांदा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 नारी शक्तीला प्रोत्साहन देणे किंवा संरक्षण दलात महिलांचे सामर्थ्य बळकट करणे हे केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे प्रमुख धोरण आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages