लिंगायत भवनच्या निधीकरीता माजी आमदार रविकांत पाटील जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवार यांची भेट... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 1, 2024

लिंगायत भवनच्या निधीकरीता माजी आमदार रविकांत पाटील जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवार यांची भेट...

 लिंगायत भवनच्या निधीकरीता माजी आमदार रविकांत पाटील जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवार यांची भेट...

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर शहरातील दोन दिग्गज नेते माजी आमदार रविकांत पाटील आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष सद्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी पुणे सर्किट हाऊस भेट घेऊन नविन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेचसोलापूर शहरातील विविध विकास कामाविषयी अजित पवार यांनी या दोघाशी प्रदीर्घ चर्चा केली 

सोमवार शहरातील लिंगायत भवन याच्या निधी संदर्भात तसे सोलापूर शहर पाण्याची दुहेरी लाईन महात्मा बसवेश्वर स्मारक असे अनेक विषय सुधीर खरटमल आणि रविकांत पाटील यानी अजित पवार यांच्या समोर सविस्तर माडणी केली त्यावर अजित पवार यांनी सांगीतले सुधीरजी आपण सांगाल ते कामे मार्गी लावून देतो आपण सोलापूरचे जेष्ठ नेते आहात आपल्याला शहरातील खडाडखडा माहीती आहै आपल्या पुढाकारातून  सुचवलेल्या शहरातील विविध विकास कामासंदर्भात तात्काळ मान्यता देण्यात येईल आपल्याला चांगल्या वाईटची जाण आहे अजित पवार जे बोलतो ते करतोच हे आपण जानता त्यावर सुधीर खरटमल यांनी सांगितल की लिंगायत भवनसाठी आपण जो 70 लाखाचा निधी मंजूर केला होता त्यासाठी आपले धन्यवाद त्याचे उदघाटन माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्यांनी 1 कोटी अधीकचा निधी जिल्हा नियोजन मधून लिंगायत भवन साठी मंजूर केला होता परंतू मधील काळात सत्तांतर झाल्यानंतर तो निधी उपलब्ध होऊ शकला नाही त्यामुळेच आपण अधीकचा निधी उपलब्ध करुन द्यावे अशी विनंती केली त्याला दादांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तुमचे प्रतेक काम मार्गी लावले जाईल सुधीरजी असे म्हणत मुंबईला परत  भेटायला येण्याचे निमंत्रण दिले तसेच  माजी आमदार रविकांत पाटील यांनी महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या जमीन आदीग्रहण संदर्भात विषय उपस्थित केला त्यावर अजित पवार म्हणाले महात्मा बसवेश्वर स्मारक तसेच सोलापूर शहरातील दुहेरीत पाण्याची पाईपलाईन यासंदर्भात लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक घेऊ त्याकरिता रविकांत आणि सुधीर आपणास निमंत्रण असेल त्यावेळी हे सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले ...

याप्रसंगी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी अनिल उकरंडे आदी  उपस्थित होते ..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages