माढा (कटूसत्य वृत्त):-श्री क्षेत्र तुळजापुर ला जोडणाऱ्या माढा वैराग ~२२३ या रस्त्याचे काम सुरु आहे.मात्र गेल्या अनेक दिवसांपासून काम अर्धवट स्थितीतच आहे.या रस्त्याचे काम करीत असलेल्या संबंधित ठेकेदाराचे बील काढु नये.अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाचे माढा शहर प्रमुख देविदास खरात यांनी दिला आहे. जिल्हा प्रशासनाला दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की,माढा ते वैराग रस्त्याचे काम ठिकठिकाणी खोदल्या मुळे प्रवासी व शहरातील नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असुन नागरिकांना श्वसनाचे आजार होऊ लागलेत.त्यामुळे ठेकेदारास काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत व ठेकेदारास जोपर्यत काम पूर्ण होत नाही. तोपर्यंत कसलेही कामाचे बील( पेमेन्ट )देऊ नये.बील दिल्यास मात्र शहरवासियां समवेत आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातुन देविदास खरात यांनी दिला आहे.निवेदनाच्या प्रती सा.बा.मंत्री,सार्वजनीक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आदींना देण्यात आल्यात.

0 Comments