Hot Posts

6/recent/ticker-posts

एस.टी. च्या कर्मचाऱ्यांना सरकारने सोडले वाऱ्यावर....! एसटी कामगार संघटना सरकारला धरणार धारेवर...!! 13 फेब्रुवारी पासून विभागीय पातळीवर बेमुदत उपोषणाचा दिला इशारा.....!!!

 एस.टी. च्या कर्मचाऱ्यांना सरकारने सोडले वाऱ्यावर....! 

एसटी कामगार संघटना सरकारला धरणार धारेवर...!! 

13 फेब्रुवारी पासून विभागीय पातळीवर बेमुदत उपोषणाचा दिला इशारा.....!!! 


पुणे (कटू सत्य वृत्त ): -राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर राज्याच्या गादीवर बसलेल्या ट्रिपल इंजिन सरकारने एस.टी. च्या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून रात्रंदिवस सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्यामुळे एस.टी. कामगार  संघटनेच्या वतीने 13 फेब्रुवारी 2024 पासून राज्यातील सर्व विभागीय पातळीवर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, " दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी संघटनेच्या बेमुदत उपोषण नोटीसीच्या अनुषंगाने शासन पातळीवर संघटने समवेत झालेल्या बैठकीत रा.प .महामंडळ  आणि शासन यांनी मान्य केलेल्या कामगार करारात शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता,  घरभाडे भत्ता, घर भाडे भत्त्याची व वार्षिक वेतन वाढीची वाढीव दराची थकबाकी देण्या संदर्भात पंधरा दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मान्यता प्राप्त कामगार संघटने समवेत बैठक घेण्याचा निर्णय मान्य करण्यात आला होता. परंतु सरकारने अद्याप बैठक न घेता शब्द पाळलेला नाही. त्यामुळेच एसटी कामगार संघटना रस्त्यावर उतरली असून राज्याचे अप्पर मुख्य सचिव( वित्त), परिवहनचे प्रधान सचिव, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महामंडळ यांची समिती अन्य आर्थिक मागण्यांवर ज्याप्रमाणे 2016- 2020  च्या कामगार करारासाठी शासनाने एकतर्फी जाहीर केलेल्या 4849 कोटी मधील  शिल्लक रकमेचे वाटप  5000 रुपये, 4000 रुपये, 2500 रुपये मूळ वेतनात गेलेल्या वाढीमुळे सेवाजेष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात विसंगती आली  असून ही विसंगती दूर करण्यासाठी उपोषणाचा मार्ग कर्मचाऱ्यांनी स्वीकारला आहे. 

त्याचबरोबर रा.प. च्या कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित देणी देणे. या सर्व मागण्यांवर मान्यताप्राप्त संघटने समवेत चर्चा करून आपला अहवाल शासनात 60 दिवसात सादर करण्याचे मान्य केलेले होते.परंतु येरे माझ्या मागल्या या म्हणीप्रमाणे सरकारने 60 दिवसाची मुदत संपूनही अद्याप पर्यंत बैठक न लावल्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आणि नाराजी पसरले आहे. आपल्या हक्कासाठी सर्व कर्मचारी एकवटला असून न्याय वेळेपर्यंत हे कर्मचारी बेमुदत उपोषण करणार असल्याचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी शेवटी बोलताना सांगितले. 

सर्व प्रलंबित मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्यात अन्यथा 13 डिसेंबर 2024 पासून राज्यातील सर्व विभागीय पातळीवर बेमुदत उपोषण करणार तसेच या नोटीसीची शासनाने गंभीरपणे दखल न घेतल्यास हे बेमुदत उपोषण राज्यातील सर्व आगार पातळीवर पुढच्या टप्प्यात सुरू करण्यात येईल. 

यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीत संघटना जबाबदार राहणार नसून शासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले असून त्वरित तोडगा काढावा अन्यथा 13 फेब्रुवारी 2024 पासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा एस.टी. कामगार संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष संदीप शिंदे आणि जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments