शासकीय योजना ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी ग्राहक दिन कार्यक्रम उत्तम व्यासपीठ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 19, 2023

शासकीय योजना ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी ग्राहक दिन कार्यक्रम उत्तम व्यासपीठ

 शासकीय योजना ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी

 

ग्राहक दिन कार्यक्रम उत्तम व्यासपीठ 


   -- जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे




सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-   शासकीय योजनांविषयी  व्यापक प्रमाणात जनजागृती करणेग्राहकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे तसेच ग्राहकांना आपल्या हक्काबाबत जागरुक करण्यासाठी  ग्राहक दिन कार्यक्रम उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे मत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी व्यक्त केले.

जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयसोलापूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.  यावेळी अन्न धान्य वितरण अधिकारी सुमित शिंदेसहायक आयुक्त (अन्न ) सु. जिंतुरकरकार्यकारी अभियंता रमेश राठोडआशिष मेहताउपप्रादेशिक परिवहन विभागवाहतुक शाखाबीएसएनएलराज्य परिवहन विभागकृषी विभाग यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

           यंदा शासकीय सुट्टी असल्याने दि. 24 ऐवजी ग्राहक दिन मंगळवारदि. 26 डिसेंबर 2023 रोजी बहुउद्देशीय सभागृहजुने जिल्हाधिकारी कार्यालयसोलापूर येथे साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.   यावर्षीची संकल्पना Effective disposal of cases in consumer commissions (ग्राहक आयोगातील प्रकरणे प्रभावीपणे निकाली काढणे) ही आहे. या संकल्पनेवर ग्राहकांची जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना असल्याचे . सरडे यांनी सांगितले.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages