शिव महापुराण कथा सोहळ्यात केल्या पोळ्या भाविकांच्या सेवेत अभिजीत पाटील तल्लीन ! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 29, 2023

शिव महापुराण कथा सोहळ्यात केल्या पोळ्या भाविकांच्या सेवेत अभिजीत पाटील तल्लीन !

शिव महापुराण कथा सोहळ्यात केल्या पोळ्या भाविकांच्या सेवेत अभिजीत

 पाटील तल्लीन !




  पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- चंद्रभागा मैदान पंढरपूर येथे श्री हरिहर शिव महापुराण कथा सोहळ्याचा चौथा दिवस अलोट गर्दी आणि भाविकांच्या प्रचंड उत्साहात संपन्न झाला.. सुप्रसिद्ध पंडित पूजनीय .प्रदीप मिश्रा महाराज यांच्या सुमधुर वाणीतून शिवमहापुराणाच्या माध्यमातून असंख्य भाविकांना जगण्याचे ज्ञान आणि भक्तीचा भाव मिळत आहे..

कथेची लोकप्रियता दिवसागणिक वाढती असून भाविकांची संख्या आजही वाढती राहिली.. यजमान अभिजीत पाटील यांनी केलेली भाविकांची सेवा, व्यवस्थापन आणि चोख आयोजनामुळे एवढी संख्या असूनही भाविकांना कथेचा आनंद घेता येतो आहे.. 

परंपरेप्रमाणे सकाळी आरती व पूजनाने कथेची सुरुवात करण्यात आली. पंढरपूर येथील माजी व आजी नगरसेवकांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली. यावेळी शिवसेवा आणि जनसेवेचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला..

भाविकांची सेवा करताना महाप्रसादाच्या स्वयंपाकापासून, वाढप व्यवस्था, मैदानाची सफाई, शिव स्वरूप धारण करण्याची जबाबदारी व भाविकांची आस्थेने विचारपूस या सर्वच कार्यात यजमान अभिजीत धनंजय पाटील यांचा अत्यंत उत्साहवर्धक आणि सक्रिय सहभाग सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरला..

दिनांक ३१ डिसेंबर पर्यंत या कथेचे आयोजन केले असून पंढरपूर व पंचक्रोशीतील भाविकांनी या कथेचा अधिकाधिक संख्येने लाभ घ्यावा..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages