Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 4 डिसेंबर रोजी आयोजन

 जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 

4 डिसेंबर रोजी आयोजन




सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- जनतेच्या तक्रारीगाऱ्हाणी ऐकण्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे सोमवार दिनांक  4 डिसेंबर 2023 रोजी सकाळी  10.00  वाजता  जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.

या लोकशाही दिनात मागील महिन्यातील प्रलंबित निवेदन व अर्जमाहिती अधिकार अधि.-2005 अंतर्गत प्राप्त अर्जआपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारीवर केलेली कार्यवाही याबाबत निपटारा करण्यात येणार आहे. तसेच  नागरिकांच्या लोकशाही दिनातील अर्जावरही कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती निवासी  उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments