निवृत्तीवेतन धारकांना गुंतवणुकीची माहिती 15 डिसेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, December 1, 2023

निवृत्तीवेतन धारकांना गुंतवणुकीची माहिती 15 डिसेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

 निवृत्तीवेतन धारकांना गुंतवणुकीची  माहिती

15 डिसेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन



      सोलापूर,(कटूसत्य वृत्त):-निवृत्तीवेतन धारकांनी आयकर नियमानुसार वजावटीसाठी केलेली गुंतवणूक,  बचत, विमा पॉलिसी, पॅनकार्डइ.माहिती फॉर्म -12 बीबी मध्ये भरुन गुंतवणुकीच्या सर्व कागदपत्रासहित दि.15 डिसेंबर 2023 पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालयसोलापूर येथे जमा करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी स.र.मोमीन यांनी केले आहे.

 

                आयकर वसुलीचे नवीन Section 115BAC नुसार आर्थिक वर्ष 2023-24 च्या आयकर गणनेसाठी New Tax Regime  व Old Tax Regime असे दोन प्रकार ठरविण्यात आले आहेत.  वरीलपैकी योग्य असणारा Tax Regime  किंवा  Old Tax Regime निवडावा तसेच याकरिता आवश्यक असल्यास आपल्या नजीकच्या सनदी लेखापालांचीही मदत घ्यावी. आपण निवडलेले पर्याय कोषागार कार्यालयास वैयक्‍तीकरित्या / पोस्टाने । इमेलव्दारे आपले नाव PPO NO. BANK व  BRANCH सहीत दि. 15 डिसेंबर 2023 पर्यंत कळविण्यात यावेत.  आपण निवडलेल्या Tax Regime  नुसार देय होणारी टीडीएस वजाती करता येईल.


                 जे निवृत्तीवेतनधार Tax Regime  ची निवड वेळेत कळवणार नाहीत,  त्यांची पुर्वीप्रमाणे Old Tax Regime मध्ये  वजाती करावी लागेल, याची नोंद घ्यावी, असे पत्रकात नमूद आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages