खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा शोध लावा
शिवसेनेची (ठाकरे) जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी मुंबई, दिल्ली, कलकत्ता...
सोलापूरचा खासदार बेपत्ता
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे गेल्या अनेक महिन्यांपासून मतदार संघात दिसत नाहीत, मतदारांना भेटत नाहीत, कोणीही त्यांना भेटण्यासाठी गेल्यास त्यांचा पत्ताच नसतो. ही बाब लक्षात खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांचा शोध लावण्यात यावे, अशी उपहासात्मक मागणी शिवसेना (ठाकरे) शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.: खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी हे भेटतच नाहीत. त्यामुळे त्यांचे काही बरेवाईट तर झाले नाही ना? मतदारसंघातून ते पळून, तर गेले नाही ना? त्यांचे कोणी अपहरण, तर केले नाहीत ना? अशी शंका निर्माण होत आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे. 'हडप, झडप खासदार गडप', परत या, परत या खासदार सिध्देश्वर महास्वामी परत या' 'मुंबई, दिल्ली, कलकत्ता, सोलापूरचे खासदार बेपत्ता', 'शिवसेना झिंदाबाद' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला होता या शिष्टमंडळात उपनेते शरद कोळी, उपनेत्या अस्मिता गायकवाड, सहसंपर्कप्रमुख उत्तमप्रकाश खंदारे, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, मनपा क्षेत्रप्रमुख विष्णू कारमपुरी, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर, संतोष पाटील, शहरप्रमुख महेश धाराशिवकर, दत्तात्रय वानकर, संतोष केंगनाळकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका प्रिया बसवंती आदींचा समावेश होता.
पी ए. मार्फत विकला जातो खासदारांचा निधी
एखाद्या गावाला, नगरपालिका किंवा महानगरपालिकेसाठी निधी सहजासहजी मिळत नाही. खासदारांचा निधी त्यांच्या पी. ए. मार्फत दहा टक्क्यांनी विकला जातो, असा आरोप शिवसेना लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी या वेळी केला.
0 Comments