Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभागामध्ये कुशल संघटन तयार करून सर्वाधिक निधी खेचून आणून :- किसन जाधव

 प्रभागामध्ये कुशल संघटन तयार करून सर्वाधिक निधी खेचून आणून 

- किसन जाधव

प्रभाग क्रमांक 22 येथे ५ लाख रुपये खर्चित सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे

 कामाचे शुभारंभ

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-प्रभाग क्रमांक 22 च्या विकासासाठी दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून अति दुर्गम भागामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी आपण नेहमी अग्रेसर असतो जिल्हास्तर असो किंवा राज्यस्तर असो या माध्यमातून सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभागाच्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी आम्ही नेहमी अग्रेसर असतो प्रभागामध्ये कुशल संघटन तयार करून सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला असल्याचे मत सोलापूर महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी गटनेते किसन जाधव यांनी प्रभाग क्रमांक 22 येथील एतीम खाना दोन नंबर झोपडपट्टी अस्लम शेख घर ते रोनक बेकरी पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाप्रसंगी व्यक्त केलं. प्रभाग क्रमांक 22 येथे नागरिकांना विविध सोयी सुविधा मिळाव्या यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो जिल्हास्तर तसेच राज्यस्तरावरून सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधने असल्याचे येथील नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या माध्यमातून विविध विकास कामे झाले आहेत. दरम्यान प्रभाग क्रमांक 22 येथील यतीम खाना 2 नंबर झोपडपट्टी अस्लम घर ते रोनक बेकरी पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व सोलापूर महानगरपालिकांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 22 येथील कार्यसम्राट नगरसेवक किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सण 2020-2021 भांडवली निधी या अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले याप्रसंगी आरिफ शेख जाकीर शेख असलम शेख इब्राहिम शेख, व्हनकळस मामा, यासीन शेख, मुस्तफा शेख, शाहजान शेख, जब्बार काटे वाले, यासीन शेख, राहुल भोसले, बाळू बिडकर, समीर आत्तार, इमरान शेख, अब्दुल सय्यद, माऊली जरग, माणिक कांबळे, महादेव राठोड, यांच्यासह प्रभाग क्रमांक 22 येतील जेष्ठ नागरिक आदींची उपस्थिती होती. आज पर्यंत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वाधिक निधी खेचून आणून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला. तसेच यावेळी प्रभाग क्रमांक 22 च्या वतीने कार्यसम्राट नगरसेवक किसन जाधव यांचा प्रभागामधील विकास कामा संदर्भात सामूहिक सत्कार करण्यात आला.दरम्यान यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून प्रभाग 22 चा सर्वांगीण विकास साधला असल्याचेही यावेळी किसन जाधव म्हणाले यांनी आपल्या मनोगत व्यक्त केलं



Reactions

Post a Comment

0 Comments