आ राम सातपुते यांच्या प्रयत्नातून 25/15 योजनेअंतर्गत 5 कोटीचा निधी
मंजूर
अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांसाठी आ राम सातपुते यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आ रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध विकास कामांसाठी 25/15 योजनेअंतर्गत 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने माळशिरस तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे
माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी विविध योजना सातत्याने राबवून यासाठी राज्य सरकारकडून भरीव निधीची तरतूद करण्यात आ राम सातपुते सतत प्रयत्नशील असतात . तालुक्यातील विविध विकास कामांसाठी ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा करिता 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यामध्ये तालुक्यातील इस्लामपूर येथे जिजाऊ चौक सुशोभीकरण करणे , मारकडवाडी ,पिलीव व भांबुर्डी पूल बांधणे, रेडे, कुसमोड ,फोंडशिरस, बचेरी, शेंडेचिंच, तांबवे ,बांगार्डे, पाणीव, पळस मंडळ ,पठाणवस्ती, झंजेवाडी ,विजोरी, खंडाळी, मांडवे, कचरेवाडी ,गारवड, दसुर, मगरवाडी, पिरळे, गुरसाळे या ठिकाणी सभामंडप बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आलाआहे . सदाशिवनगर,कण्हेर, पिलीव, उंबरे दहीगाव, खुडूस, उंबरे, काळमवाडी, कोळेगाव या ठिकाणी रस्ता सुधारणा करणे कामेही निधी मंजूर करण्यात आला आहे .
तिरवंडी येथे स्मारक बांधणे ,वेळापूर येथे काँक्रीट रस्ता तयार करणे ,लोणंद, पिंपरी, उंबरे दहीगाव येथे पाण्याची टाकी बांधणे, सदाशिवनगर व चाकोरे येथे पेवर ब्लॉक बसविणे ,शेंडेवाडी येथे स्ट्रीट लाईट बसवणे संग्रामनगर, माळीनगर येथे गटार लाईन करणे , फळवणी येथे वॉल कंपाऊंड सुशोभीकरण करणे ,विजयवाडी व चौंडेश्वरवाडी या ठिकाणी स्मशानभूमी बांधकाम करणे व दुरुस्ती करणे कामेही या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला आहे .
आ. राम सातपुते हे माळशिरस तालुक्याच्या चौफेर विकासासाठी सातत्याने निधी आणत आहेत यामुळे माळशिरस तालुक्याच्या सर्वांगीण विकासात दिवसेंदिवस भर पडत आहे याच अनुषंगाने 25 / 15 अंतर्गत 5 कोटींचा निधी माळशिरस तालुक्यात आल्याने माळशिरस तालुक्यातील रस्ते, सभामंडप, पूल बांधणे, चौक सुशोभीकरण , स्ट्रीट लाईट, वॉल कंपाऊंड ,स्मशानभूमी दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची टाकी बांधकाम आदी सर्वसामान्यांच्या हिताची व त्यांच्याशी निगडित असणारी विविध विकासकामे होणार असल्याने सर्वसामान्यातून समाधान व्यक्त होत आहे
0 Comments