Hot Posts

6/recent/ticker-posts

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केली सुचना "अन् विर धरणामधून निरा उजव्या कालव्यात सोडण्यात आले पाणी"

 आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केली सुचना

"अन् विर धरणामधून निरा उजव्या कालव्यात सोडण्यात आले पाणी"

अकलूज  (कटूसत्य वृत्त):-सोलापूर जिल्ह्यातील निरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळाजन्या परीस्थिती निर्माण झाली आहे. दिवाळी सण तोंडावर असताना पिकांना व पिण्याचे पाण्याचे संकट उद्भवले आहे.. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना केलेल्या सूचनेनुसार  १० नोव्हेंबर रोजी निरा उजव्या कालव्यात सोडण्यात येणारे पाणी आज दि.७ नोव्हेंबर रोजीवीर धरणामधून पंढरपूर माळशिरस सांगोला ,फलटण तालुक्यासाठी सोडण्यात आले. 

शेतकऱ्यांनी आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वीर धरणामधून निरा उजवा कालव्याला लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे म्हणून मागणी केली होती. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तात्काळ जलसंपदा विभागचे मुख्य अभियंतास सुचना केली.

Reactions

Post a Comment

0 Comments