भक्तांच्या सेवेमुळे मंडळाचे नांव जगभरात पसरत आहे - सुप्रिया पाठारे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 15, 2023

भक्तांच्या सेवेमुळे मंडळाचे नांव जगभरात पसरत आहे - सुप्रिया पाठारे

 भक्तांच्या सेवेमुळे मंडळाचे नांव जगभरात पसरत आहे - सुप्रिया पाठारे



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून होत असलेल्या भक्तांच्या सेवेमुळे मंडळाचे नांव जगभरात पसरत असल्याचे मनोगत प्रसिध्द मराठी कलाकार सुप्रिया पठारे यांनी व्यक्त केल्या.

त्या श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आल्या असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या. 

यावेळी मंडळाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, धानप्पा उमदी, संभाजीराव पवार, निखील पाटील, बाळासाहेब घाटगे, दत्ता माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, शावरप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगणुर, शिवराज स्वामी, निंगप्पा बिराजदार, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages