Ads

Ads Area

दीपावलीच्या शुभ पर्वात पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे "दीपसंध्या" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार आयोजन

 दीपावलीच्या शुभ पर्वात पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे "दीपसंध्या" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार आयोजन सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे मूलभूत प्रशिक्षण सत्र क्रमांक-24 मधील नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांच्याकरिता काल दिनांक 09/11/2023  रोजी सायंकाळी बहारदार अशा *दिपसंध्या* या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आणि संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. दीपावलीच्या पहिल्याच दिवशी पंधराशे पणत्यांची प्रशिक्षणार्थीं, प्राचार्य डॉक्टर वैशाली कडूकर, उपप्राचार्य अनुराधा उदमले, निमंत्रित याच्या हस्ते दीप प्रज्वलित करून त्यातून *पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर  सत्र क्रमांक 24* अशा प्रकारची आरास करण्यात आली होती. या कामी प्रसिध्द चित्रकार  सचिन खरात यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमा साठी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेचे संचालक. अमोल पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रादेशिक सचिव  शहाजीभाऊ पवार व सुवर्णाताई पवार, इंद्रप्रस्थ हॉटेलचे इंद्रजित पवार व संध्याताई पवार, व्ही. पी. शुगर्सचे  व्ही. पी. पाटील, प्रसिध्द उद्योजक प्रविण भुतडा व प्राची भुतडा, माननीय पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रुपाली राजेंद्र माने, डॉ. अग्रजा चिटणीस, श्रीमती तेजस्विनी बोराडे, श्रीमती वैशाली कबाडे, व्यावसायिक मयूर शहा व डॉ. ओजस शहा, व्ही. आर. पवार सारीजचे गिरीश पवार व स्नेहा पवार, स्टाईल मंत्राचे अमोल पांचाळ आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सर्व अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते. कार्यक्रमाची  रूपरेषा आणि मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉक्टर वैशाली कडूकर  यांनी सर्व उपस्थित मान्यवर, सहकारी अधिकारी/अंमलदार, त्यांचे कुटुंबीय आणि प्रशिक्षणार्थी यांना दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या उपप्राचार्य अनुराधा उदमले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close