Hot Posts

6/recent/ticker-posts

अपहार प्रकरणी पिग्मी एजंटची जामीनावर मुक्तता अतिरिक्त सत्र न्यायालयाचा आदेश

 अपहार प्रकरणी पिग्मी एजंटची जामीनावर मुक्तता अतिरिक्त सत्र न्यायालयाचा आदेश



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील कणबस येथील रहिवासी विश्वनाथ गंगाधर चिट्ठे  या पिग्मी एजंटाची ठेवीसाठी रक्कम स्वीकारत अंदाजे 30 लाखाचा अपहार केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी जामीनावर मुक्त करण्याचा आदेश दिला आहे. 
सविस्तर वृत्त असे की, " विश्वनाथ चिट्ठे हे एका पतसंस्थेत  पिग्मी एजंट म्हणून काम करत होते. त्या पतसंस्थेचे काम सोडलेले असताना सुद्धा त्याने 2013 ते 2016 या कालावधीमध्ये मजरेवाडी भागातील काही नागरिकांच्या पिग्मी व ठेवी स्वीकारून त्यांना खोटे बनावट पिग्मी बुक देऊन वेळोवेळी बनावट ठेव पावत्या देऊन एकूण 30 लाख रुपये रकमेची फसवणूक करून अपहार केला. अशा आशयाच्या अनेक तक्रारी विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये मजरेवाडी परिसरातील नागरिकांनी केल्या होत्या. त्याप्रमाणे विश्वनाथ चिट्ठे विरुद्ध  यासाठी गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये त्यांना 11 /4 /2023 रोजी अटक करण्यात आली होती. आरोपी चिट्ठे यांनी  न्याय दंडाधिकारी कोर्टात जामीन अर्ज केला होता. परंतु प्रथम तो तक्रारदारांची संख्या वाढू शकते व महाराष्ट्र ठेवी संरक्षण कायदा लागू होऊ शकतो. याचा विचार करून त्या परिस्थितीत जामीन देता येणार नाही असे निरीक्षण नोंदवून कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला होता. 
तथापि त्यानंतर दुसऱ्यांदा आरोपीने सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून तक्रारदाराची कोणतीही संख्या वाढली नाही तसेच महाराष्ट्र ठेवी संरक्षण कायदा लागू झाला नाही. या दोन्ही बाबी न्यायालयासमोर स्पष्टपणे निदर्शनास आणून देऊन 
 जामिनाची मागणी केली. व त्यासाठी उच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले. 
या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने जामिनावर मुक्त करण्याचा आदेश मंजूर केला. 
या प्रकरणात आरोपीतर्फे अँड.  शशिकांत कुलकर्णी, अँड.गुरुदत्त बोरगांवकर, अँड. देवदत्त बोरगांवकर, अँड .प्रसाद अग्निहोत्री ॲड.आशुतोष पुरवंत ॲड.  प्रणव उपाध्ये  यांनी काम पाहिले तर सरकारी पक्षातर्फे अँड.  देशपांडे यांनी काम पाहिले.



Reactions

Post a Comment

0 Comments