मोहोळ मध्ये शिवपरण , कालीपरण , दुर्गापरण व शिवतांडव परणाने रसिक मंत्रमुग्ध
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ येथील संगीत विद्यालय व संगीत कला अकादमी च्या वतीने आयोजित केलेल्या "भक्तिमय दिवाळी पहाट " या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थीनी कु. श्रेया वनकळसे , सुभद्रा खांडेकर , श्रीमती प्रतिभा मारडकर , कु. संजीवनी वाघमोडे , कार्तिकी कुंभार , श्रेयस मैंदरकर , समृद्धी कारंडे, साक्षी कुलकर्णी व चि. गुरुराज वाघमोडे व शेखर चौधरी यांनी विठू माझा लेकुरवाळा , तुकोबाची अमृतवाणी , साधका बहू गोड , अमृताहुनी गोड , उच-नीच काही , दरशन देरे , श्री स्वामी समर्थ , आजी सोनियाचा दिनू , येगं येगं विठाबाई , एकतारी संगे , जेथे जातो , खेळ मांडियेला , कानडाहू विठ्ठलू , नाम गाऊ नाम घेऊ , चंद्रभागेच्या तीरी व बाजाराला विकण्या निघाली ; हे अभंग व गौळणी सादर केल्या.
विद्यार्थी चि. निल देशपांडे , श्रेयस जगताप , श्रीराज वनकळसे , संकेत आदलिंगे, प्रज्वल कुलकर्णी , सोहम धायगुडे , मनिष गायकवाड कु. राधा वाघमोडे व अनन्या महामुनी यांनी ताल तिनताल मधे कायदे , चक्रधार व रेला वाजवून ग्रुप सोलो वादन केले.
सार्थक बोराडे याने ताल झपताल मधे तबला सोलो वादन केले .
विद्यार्थ्यांना हार्मोनियम व तबला साथ मयुर पुराणिक व देवानंद सुतार यांनी केले .
कार्यक्रमात पुणे अतिथी कलाकार आकाश तुपे यांनी ताल चौताल मधे पखवाज सोलो वादन केले व विद्यार्थी स्वप्निल सुर्यवंशी यांनी त्यांना पखवाज साथ दिली तर यशवंत थिटे यांनी राग किरवाणी मधे हार्मोनियम वरती लेहरा साथ दिली .
आकाश तुपे यांनी ताल चौताला मधे तिस्त्र जाती चलन , प्रस्तार , चतुस्त्र जाती मधे रेला , तुकडे , फरमाईशी - कमाली चक्रधार , गत व शिवपरण , कालीपरण , विष्णू परण , दुर्गापरण व शिवतांडव परण अशा अनेक रचनांची माहितीसह सादरीकरण करत असताना प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडले.
राजाभाऊ देशमुख , राजेंद्र वाकळे सर , श्रीधर उन्हाळे सर , कुरुल चे पोपट कडबणे , अंकोलीचे आदर्श शिक्षक पैगंबर तांबोळी सर , आनंद माळी , अनुष्का माळी , कदम सर , दुर्गा जाधव मॅडम , कोरे मॅडम , दिनश नरळे सर , भारत नाईक , सुहास घोडके , पत्रकार संजय आठवले संतोष भुसे या रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अशा कार्यक्रमाच्या आयोजना बद्दल संगीत विद्यालयाला शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.
कार्यक्रम संपन्न करण्यासाठी भास्कर चौधरी , देवानंद सुतार , ओम सुतार, अमर थिटे , ऋषिकेश झेंडगे , अथर्व कोरे , प्रणव गायकवाड अथर्व काकडे , शुभम सिताप , स्नेहल महामुनी , साहिल शिंदे , जुनैद तांबोळी , सौरभ गुमते तन्मय नाईक , विराज पवार यांच्यासह विद्यालयाचे आजी - माजी सर्वच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले .
कार्यक्रमाची प्रस्तावना उमेश्वर पुराणिक यांनी केले , सूत्रसंचालन विद्यार्थी भास्कर चौधरी व श्रेयस मैंदरकर यांनी केले तर अशोक पाचकुडवे यांनी आभार मानले.
0 Comments