Hot Posts

6/recent/ticker-posts

पालावरच्या ऊस तोड मुजरासोबत दिवाळी साजरी करत आ राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती यांनी जपली सामाजिक बांधिलकी

 पालावरच्या ऊस तोड मुजरासोबत दिवाळी साजरी करत आ राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती यांनी जपली सामाजिक बांधिलकी 




अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळशिरस तालुक्याचे आ राम सातपुते यांच्या सुविद्य पत्नी संस्कृती सातपुते यांनी आ रामभाऊ सातपुते यांचे वडील विठ्ठल सातपुते यांच्यासमवेत पालावरच्या नागरिकांसमवेत दिवाळी साजरी करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. मांडवे येथील ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन ऊसतोड कामगार, महिला व त्यांच्या लहान लहान मुलांना दिवाळी फराळ, फटाके तसेच नवीन कपडे देऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. वंचितांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हाच दिवाळीचा खरा आनंदोत्सव असल्याचे मत संस्कृती सातपुते यांनी बोलताना सांगितले.

    दिवाळी ही आनंदाची, चैतन्याची आणि तेजोमय दिव्यांची असते मात्र आपल्या आजूबाजूला कामानिमित्त घरापासून दूर असलेले पालावर राहणारे बांधव दिवाळी करू शकत नाहीत, त्यांच्या घरी दिवाळी व्हावी असे वाटते. त्याच जाणीवेतून मांडवे येथील ऊसतोड कामगारांच्या पालावर संस्कृती सातपुते यांनी जाऊन त्यांची भेट घेतली, विचारपूस केली. त्यांना कपडे, मिठाई भेट  दिली. त्यांच्या मुलांना फटाके आणि महिलांना साड्या दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद ओसंडून वाहत होता तो आनंद समाधान देणारा असतो. आयुष्यात कुणाच्या तरी चेहऱ्यावर आपण हास्य आणू शकलो याचा मोठा आनंद असल्याचेही  संस्कृती राम सातपुते यांनी बोलताना सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments