अनगरचे अमोल मोरे "काव्य शिरोमणी" पुरस्काराने सन्मानित
अनगर (कटूसत्य वृत्त):- सोपान बाग पुणे येथे प्रभावती साहित्य समूह आणि काकडे- देशमुख शिक्षण संस्थेतर्फे पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन संपन्न झाले.यामध्ये अनगर येथील अमोल मोरे यांना मराठी कवितेतील योगदानासाठी "काव्य शिरोमणी" या पुरस्कार देवून सम्मेलन अध्यक्ष गझलकार किरण वेताळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ, विजय काकडे, शरदचंद्र काकडे देशमुख, रोहिणी पारडकर आदि उपस्थित होते.
या त्यांच्या यशाबद्दल माजी आमदार राजन पाटील, लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील प्राचार्य चंद्रकांत ढोले, प्राचार्य डॉ चंद्रकांत सूर्यवंशी आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
0 Comments