भाजप पाचपैकी तीन राज्यात नक्कीच विजयी होईल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला
मुंबई (कटूसत्य वृत्त):- मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. मिझोरममध्ये निवडणुका संपल्या आहेत, तर छत्तीसगडमध्ये मतदानाचा एक टप्पा पार पडला आहे.
मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर, राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणे बाकी आहे. यासोबतच छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान १७ नोव्हेंबरला होणार आहे. निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला लागणार आहे. या सर्व परिस्थितीत भारतीय जनता पक्ष पाचपैकी तीन राज्यात नक्कीच विजयी होईल, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी नागपुरात केला.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, ‘आम्ही ५ पैकी ३ राज्यांमध्ये नक्कीच जिंकणार आहोत. मिझोराममध्ये आमची संख्या वाढेल आणि आम्ही तेलंगणात जिंकू. मला विश्वास आहे की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आम्ही जिंकणार आहोत.शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली २० वर्षात केलेले चांगले काम आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षात केलेल्या कामांमुळे आम्ही मध्य प्रदेशात नक्की जिंकू” असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला आहे.
0 Comments