एक कोरोना योद्धा.... आणि एक मराठा योद्धा..... आमच्या अंबड तालुक्यातील हे दोन योद्धे.... कोणतंही काम हाती घेतलं तर ते झोकून देऊन करायचं आणि ते मार्गी लावायचं असं यांच वैशिष्ट्य ..... आपण दोन वर्षांपूर्वी कोरोना काळातले प्रसंग अनुभवले... त्यावेळी आरोग्यमंत्री म्हणून मा. आ. श्री. राजेशभैय्या टोपे साहेब यांच्यावर जबाबदारी आली आणि कोरोना चालू झाला यावेळी एकही व्यक्ती रस्त्यावर उतरताना आपल्याला दिसत नव्हता पण आपण सर्वांनी पाहिलं असेल राजेशभैय्या टोपे साहेबांनी यामध्ये स्वतःला झोकून दिलं.... जीवाची परवा केली नाही आणि अहोरात्र जनतेची काळजी घेतली.... आपली स्वतःची आई आजारी होती तरी ते जनतेची सेवा करत होते... आजारी पणातच आईचे निधन झाले.... तीनच दिवसात सर्व विधी करून आपले दुःख बाजूला ठेवून कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत लोकांना धीर दिला, आधार दिला आणि असंख्य लोकांचे प्राण वाचवले....म्हणूनच ते जनतेच्या मनातले योद्धे झाले.... दुसरा योद्धा मनोज भाऊ जरांगे पाटील यांची ख्याती आपण सर्वजण पाहत आहोत.... मराठा आरक्षणाचं युद्ध हाती घेतलं आणि त्यासाठी आपलं सर्वस्व झोकून देऊन ते काम करत आहेत.... मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आपला जीव राहील न राहील याकडे न बघता अनेक उपोषण भाऊंनी केले आणि आपला मराठा आरक्षणाचा लढा चालू ठेवला... आज सहा महिने पूर्ण होतील भाऊंनी आपल्या घराची पायरीही चढलेले नाही....समाजाला न्याय मिळावा म्हणून आपला परिवार बाजूला ठेवला, कोणत्याही अमिषाला बळी न पडता, अहंकाराचा वारा न लागू देता, निःस्वार्थपणे ते समाजासाठी काम करत आहेत...... माझ्या जीवाचं काही झालं तरी चालेल पण मी समाजाला आरक्षण मिळवूनच देणार... हा संघर्ष चालू ठेवत ते समाजासाठी काम करत आहेत... मनोज भाऊंनी खूप मोठा त्याग केला म्हणूनच ते ही जनतेच्या मनातले मराठा योद्धा ठरले.....मित्रहो या दोन योध्यांनी आपले कार्य निःस्वार्थ भावनेने, प्रामाणिकपणे, सर्वस्व झोकून देऊन केले यामुळेच ते आपल्या अंबड तालुक्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर देशात योद्धे म्हणून ओळखू लागलेत... काल अंतरवाली सराटी येथे कोरोना योद्धा मा. आ. श्री. राजेशभैय्या टोपे साहेब यांनी आपला मोठेपणा बाजूला ठेवत मराठा योद्धा मनोज भाऊ जरांगे पाटील यांची भेट घेवून पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या व तब्बेतीची विचारपूस केली.... या दोन योध्यांना माझा कोटी - कोटी प्रणाम.....
-सुबोध तारक
0 Comments