पोलीस यंत्रणा म्हणजे काही यंत्र अथवा रोबोट प्रणाली नाही. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 24, 2023

पोलीस यंत्रणा म्हणजे काही यंत्र अथवा रोबोट प्रणाली नाही.

 पोलीस यंत्रणा म्हणजे काही यंत्र अथवा रोबोट प्रणाली नाही. 


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- धुळीत उभे राहून प्रचंड नरक यातना सोसुन वाहतुकीची कोंडी काढावी लागते. वास्तविक पाहता सर्विस रस्त्याचे काम अगोदर होणे महत्त्वाचे आहे उड्डाणपूल चार दोन महिने उशिरा झाला तरी चालेल सर्विस रस्ते आणि त्यावरील धूळ आणि पडलेले जीवघेणे खड्डे दुरुस्त होणे गरजेचे आहे.. वाहतूक कर्मचारी आणि पोलीस यंत्रणा तर काय करणार ? पर राज्यातील हजारो जड वाहने मार्गस्थ होतात आणि अरुंद एकेरी वाहतुकीच्या सर्विस रस्त्यावर दररोज अडकून पडतात.. वाहतुकीची कोंडी काढण्यासाठी धोकादायकरित्या दुचाकीवरून या लेन मधून ये जा करणाऱ्या एखाद्या निष्पाप पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवाचा देखील विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस यंत्रणा आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने संबंधित ठेकेदाराला अगोदर सर्विस रस्त्याचे अद्यावत काम करण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे.

मोहोळ पोलीस स्टेशनचे वाहतूक शाखेचे कर्मचारी बांधव आणि स्थानिक कर्मचारी बांधवांनी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ महामार्गावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यामध्ये त्यांना यश मिळत असून आणखी वीस मिनिटात वाहतूक पूर्ववत गतीने सुरू होईल

उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, मोहोळचे शिस्तप्रिय पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, गोपनीय शाखेचे निलेश देशमुख आणि वाहतूक शाखेच्या कर्मचारी पो . ना .बाबर, पो.ना. रोडे या  बांधवांनी तात्काळ याबाबत आवश्यक ती उपाययोजना करत वाहतुकीची कोंडी कमी करण्यामध्ये यश मिळवले आहे

या वाहतुकीच्या उपायोजनेबाबत समय सुचकता दाखवत तातडीने आवश्यक तो निर्णय घेत वाहतुकीच्या कोंडीबाबत उपाययोजना करणारे गतिमान कार्यशैलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि  मोहोळचे पोलीस शिस्तप्रिय निरीक्षक सुरेशकुमार राऊत आणि मोहोळ पोलीस प्रशासनाच्या सर्व टीमचे मोहोळकर अंतकरण पूर्वक आभार मानत आहेत

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages