गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना कपडे वाटून दिवाळी साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 24, 2023

गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना कपडे वाटून दिवाळी साजरी

 गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना कपडे वाटून दिवाळी साजरी



कसबे तडवळे.(कटूसत्य वृत्त):- धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील क्लासमेट ग्रुप तर्फे गरिब,अनाथ विद्यार्थ्यांना कपडे वाटप करून अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली.

दिनांक 19.11.2023 रोजी कसबे तडवळे येथील क्लासमेट ग्रुप 1998-1999 यांनी "माझं गाव माझं तीर्थ" या ब्रीद वाक्यास अनुसरून या वर्षीची दिवाळी गावातीलच गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना सोबत साजरी करण्याचे ठरवले. त्यानुसार रविवार रोजी जिल्हा परिषद आदर्श कन्या प्राथमिक शाळा,कसबे तडवळे येथे कन्या शाळा व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कसबे तडवळे येथील विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त कपडे वाटून साजरी केली. एकूण 15 विद्यार्थ्यांना कपडे वाटप करण्यात आले. त्यावेळी सय्यद, मुख्याध्यापक,धायगुडे सर कन्या शाळा व क्लासमेट ग्रुपचे काकासाहेब गावखरे, उदय माने,अमोल पवार, संतोष कापसे, विशाल जमाले, धनंजय सावंत, जाकिर तांबोळी असे उपस्थित होते. कार्यक्रमात यावेळी कन्या शाळेचे मुख्याध्यापक रेहमान सय्यद , आदर्श शिक्षक जगन्नाथ धायगुडे सर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी सदरचा उपक्रम हा अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले. प्रास्ताविक काकासाहेब गावखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष कापसे यांनी केले.या अनोख्या उपक्रमाने दिवाळी साजरी केल्याने क्लासमेट ग्रुपचे तसेच या ग्रुपचे आधारस्तंभ API महेश लांडगे यांचे कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages