लोकमंगल कृषी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
वडाळा (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान वडाळा संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे आज माजी विद्यार्थ्यांनीचा सत्कार सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. लोकमंगल कृषी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. मृणाली बनसोडे (२०१९-२२ बॅच) यांनी महाविद्यालयाला सदिच्छा भेट देताना विद्यार्थ्यांना MCAER CET ची तयारी या विषयावर मार्गदर्शन केले. सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांनी मृणालीचे रोप भेट देऊन स्वागत केले. यानंतर मृणाली बनसोडे की ज्या सध्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे कीटक शास्त्र विभागात पदव्युत्तर पदवी चे शिक्षण घेत आहेत त्यांनी विद्यार्थ्याना संबोधित करताना MCAER ची तयारी करताना वेळेचे नियोजन, अभ्यासाची महत्त्वपुर्ण पुस्तके याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. आपल्या यशामध्ये पदवी शिक्षण घेत असताना लोकमंगल मधील प्राध्यापकांनी आपल्यावरती घेतलेल्या मेहनतीचे त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी देखील पदव्युत्तर पदवी शिक्षणासंदर्भात आपल्याला असलेल्या शंकांचे समाधान विविध प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करून घेतले.अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. अमोल शिंदे यांनी माजी विद्यार्थ्यांनीने दिलेल्या अमूल्य मार्गदर्शना बद्दल आभार व्यक्त केले व सर्व विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून आपल्याला असलेल्या पुढील व्यावसायिक व शैक्षणिक संधी याबद्दल जागृत राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला प्रथम आणि चतुर्थ वर्षातील सर्व कृषी दुतांनी उस्फूर्त सहभाग दर्शविला. सदरील कार्यक्रमास प्रा.ज्योती गायकवाड, प्रा. आकाश अवघडे, प्रा. ज्योती जाधवर, आणि प्रा. अजित कुरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन अंतिम वर्ष कृषिकन्या शुभदा नानजकर हिने केले.
0 Comments