पशुधन पर्यवेक्षक पदाचा निकाल जाहीर करा : निकाल लावण्याच्या दिरंगाईमुळे उमेदवार संभ्रमीत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 9, 2023

पशुधन पर्यवेक्षक पदाचा निकाल जाहीर करा : निकाल लावण्याच्या दिरंगाईमुळे उमेदवार संभ्रमीत

 पशुधन पर्यवेक्षक पदाचा निकाल जाहीर करा : निकाल लावण्याच्या दिरंगाईमुळे उमेदवार संभ्रमीत


नाशिक (कटूसत्य वृत्त):-राज्य शासन पशुसंवर्धन विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्या संदर्भात 26 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये पशुधन पर्यवेक्षक-376, वरिष्ठ लिपिक-44, लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क)- 02, लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क)-13, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क)-04, तारतंत्री (गट-क)-03, यांत्रिकी (गट-क)-02, बाष्पक परिचर (गट-क)-02 इ. पदांच्या 446 पदाचे अर्ज मागवून IBPS या खाजगी कंपनीकडून दिनांक 9 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान परीक्षा घेण्यात आल्या. परंतु , दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र पशुसंवर्धन विभागाने निकाल कधी लागेल या संदर्भात कुठलेच परिपत्रक संकेतस्थळावर न टाकल्याने उमेदवार भ्रष्टाचार होण्याच्या भीतीनने संभ्रमीत झाले आहेत.या बाबत नुकताच कोकण विभाग कृषि पदवीधर /पदविका धारक संघर्ष समितीने राज्याचे मुखमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन तातडीने या विभागाचा निकाल लावण्याची विनंती करण्यात आली आहे.

     IBPS कंपनीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा निकाल शक्यतो 15 ते 20 दिवसांत जाहीर होतो. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व जलद होण्यासाठी शासनाने परीक्षा फी 900 ते 1000 रुपये आकारात आहे. मात्र, आपल्या विभागांतर्गत संदर्भिय परीक्षा होऊन जवळपास 2 महिना लोटत आहे तरीही अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही.

       राज्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढता आहे. त्यात पशुसंवर्धन विभागात कर्मचारी कमतरता आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाला कर्मचारी भरती लवकर होणे गरजेचे आहे. असे असतांना सदर परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास अतिविलंब होत असल्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

  पशुसंवर्धन विभागाकडून निकाल लावण्यास उशीर होत असल्याने परीक्षार्थी उमेदवारांमध्ये उलट -सुलट चर्चेला उधाण आले असून घोडेबाजाराचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या विभागाचा निकाल जाहीर करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages