Hot Posts

6/recent/ticker-posts

जालन्यातील तरुणाचं मुंबईत धक्कादायक पाऊल; मराठा आरक्षणासाठी संपवलं जीवन,

जालन्यातील तरुणाचं मुंबईत धक्कादायक पाऊल; मराठा आरक्षणासाठी संपवलं जीवन,

 मुबंई (कटूसत्य वृत्त):-जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली आहे.सुनिल कावळे हे मूळचे जालना जिल्ह्यातील अंबड येथील रहिवासी होते. सुनिल कावळे यांनी स्वतःचा शर्ट आणि वहीच्या पानावर आपण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात ही घटना घडली. आत्महत्या केलेले सुनिल कावळे हे जालन्याहून एकटेच मुबंईत आले होते. दरम्यान आत्महत्येपूर्वी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहिलं आहे. आत्महत्येच्या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून वांद्रे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments