डॉल्बीच्या कारणावरुन पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला....! १५ पाणीवेस कार्यकर्त्यांची मुक्तता....!! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 19, 2023

डॉल्बीच्या कारणावरुन पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला....! १५ पाणीवेस कार्यकर्त्यांची मुक्तता....!!

 डॉल्बीच्या कारणावरुन पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला....! 

१५ पाणीवेस कार्यकर्त्यांची मुक्तता....!! 

सोलापूर  (कटू सत्य वृत्त ):-सोलापूर शहरामध्ये नुकताच गणेश उत्सव आणि सध्या नवरात्र उत्सव सुरू असून त्या धरतीवर डॉल्बीमुक्त मिरवणुका काढण्याचे आवाहन पोलीस आयुक्त राजेंद्र मदने यांनी केले होते . परंतु सोलापूर हे उत्सव प्रिय शहर असल्यामुळे (पाणीवेस) दत्त चौक भागातील कार्यकर्ते लक्ष्मीकांत उर्फ सागर सुभाष सिरसट, निलेश शंकर काटकर, सुरज रमेश पवार, गणेश मोहन पवार, तुषार खंडोबा पवार, आकाश शिवशंकर चाटी, विक्की उर्फ उमाकांत शिवशंकर चाटी, ज्ञानेश्वर विलास कोटमळे, किसन किसन गडदूर, शुभम राजशेखर वागदुर्गी, प्रसाद पांडुरंग पवार, भाऊकांत शहाजी पवार (जाधव), रोहित सुभाष सातपुते, अभिजीत विजयकुमार हविनाळ, निखिल सुनिल भोसले या सर्वांनी डॉल्बी व नाचगाणे बंद करण्याच्या कारणावरुन पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांच्यावर हल्ला करून मारहाण केल्याचे आरोपातून सोलापूर येथील अति सत्र न्यायाधिश योगेश राणे  यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. यात हकीकत  अशी की, दि. ०६/०१/२०१५ रोजी पोलीसांना डोणगांव रोडवरील एका फार्म हाऊसवर डॉल्बीचा आवाज ऐकू आल्याने रात्र गस्तीवर असणारे कर्मचारी / पोलीस उपनिरिक्षक विश्वास भाबड व त्यांचे इतर सहाय्यक कर्मचारी वानकर फार्म हाऊसवर गेले असता तेथे त्यांना अंदाजे २० ते २५ तरुण डॉल्बीवर मद्यधुंद अवस्थेत नाचत असताना आढळून आले. त्यांना डॉल्बी बंद करण्यास सांगितले असता त्यानी त्यास नकार देवून पोलीसांवर लाकडाने, दगडाने हल्ला केला व त्यांना जखमी केले.  त्यानंतर  पोलीस अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्षाकडून ज्यादा कुमक मागवून हल्ला करण्याऱ्यापैकी १० जणांना ताब्यात घेतले.  व घटनास्थळीच्या गाड्या जप्त करुन पोलीसांनी, सरकारी कामात अडथळा, पोलीसांवर हल्ला, बेकायदेशीर जमाव जमवणे असे विविधप्रकारचे गुन्हे केल्याप्रकरणी त्यांच्यावर सलगर वस्ती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.  व न्यायालयात त्या १५ जणांविरुध्द आरोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी  अति सत्र न्यायाधिश  योगेश राणे  यांच्या समोर झाली. त्यामध्ये सरकार पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले. त्यामध्ये ६ पोलीस अधिकारी, २ डॉक्टर आणि २ पंच यांच्या महत्वपूर्ण साक्षी झाल्या. खटल्याचे चौकशीवेळी आरोपीचे वकील अॅड. शशी कुलकर्णी यांनी असा युक्तीवाद केला की, अशी कोणतीही घटना घडली नाही, पोलीसांचे गणवेश, त्यांना मारहाण झालेल्या जखमा, स्वतंत्र साक्षीदार, ध्वनीमापक यंत्र या सर्व बाबींची कुठेही सुसुत्रता नसून साक्षीदारांच्या साक्षीमध्ये प्रचंड विसंगती आहे. त्यामुळे आरोपींनी गुन्हा केल्याचे  सिध्द होत नाही. त्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता व्हावी असा युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. शशि कुलकर्णी, अॅड. स्वप्निल सरवदे, अॅड. रणजित चौधरी, अॅड. प्रसाद अग्निहोत्री, अॅड. आशुतोष पुरवंत यांनी काम पाहिले. तर सरकार पक्षातर्फे अॅड. देशपांडे यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages