Hot Posts

6/recent/ticker-posts

संत नरहरी प्रतिष्ठान च्या वतीने राज्यस्तरीय 75 कर्तृत्ववान आदर्श व्यक्तींना पारितोषिक जाहीर....! 19 नोव्हेंबर रोजी अक्कलकोट येथे होणार शानदार सोहळा...!! संस्थापक चंद्रकांत वेदपाठक यांची घोषणा....!!!

 संत नरहरी प्रतिष्ठान च्या वतीने राज्यस्तरीय 75 कर्तृत्ववान आदर्श व्यक्तींना पारितोषिक जाहीर....! 

19 नोव्हेंबर रोजी अक्कलकोट येथे होणार शानदार सोहळा...!! 

संस्थापक चंद्रकांत वेदपाठक यांची घोषणा....!!! 

अक्कलकोट (कटू सत्य वृत्त): -संत नरहरी प्रतिष्ठान व चंद्रकांत दादा वेदपाठक सामाजिक मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने" भारताचा अमृत काळ" निमित्त राज्यस्तरीय 75 कर्तृत्ववान आदर्श व्यक्तींना स्मृतीचिन्ह पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हा पारितोषिक सोहळा 19 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता अक्कलकोट येतील सर्जेराव जाधव सभागृहात होणार असून अक्कलकोट शहरातील 75 गरीब निराधार महिलांना साडीचोळी आणि धान्यवाटप ही करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठान व मित्र मंडळाचे संस्थापक तथा संयोजक चंद्रकांत वेदपाठक यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना वेदपाठक म्हणाले की, " या पारितोषिक वितरण समारंभाचे उद्घाटन पुणे येथील सुवर्ण पुष्प संस्थेचे संस्थापक जगदीश महामुनी यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांची उपस्थिती लाभणार आहे. 

या कार्यक्रमासाठी शिवसेना सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रा.  शिवाजी सावंत अक्कलकोटचे आमदार सचिन  कल्याण शेट्टी,  माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, विरक्त मठातील बसवलिंग महास्वामीजी, स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, ओबीसी संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रा.  राजन दीक्षित, शिवसेना तालुका अध्यक्ष संजय देशमुख या मान्यवरांच्या हस्ते कर्तृत्ववान व्यक्तींना पारितोषिक वितरण होणार आहे. 

या कार्यक्रमात राज्यस्तरीय श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार, विश्वकर्मा आदर्श पत्रकार पुरस्कार,  विश्वकर्मा आदर्श शिक्षक पुरस्कार,  विश्वकर्मा आदर्श वैद्यकीय पुरस्कार,  विश्वकर्मा आदर्श विधीज्ञ पुरस्कार,  विश्वकर्मा आदर्श अभियंता पुरस्कार ,विश्वकर्मा आदर्श पौरोहित्य भूषण पुरस्कार ,विश्वकर्मा आदर्श प्रशासकीय पुरस्कार ,विश्वकर्मा आदर्श उद्योग भूषण पुरस्कार,  विश्वकर्मा आदर्श स्वातंत्र्य सैनिक पुरस्कार ,विश्वकर्मा आदर्श कला भूषण पुरस्कार,  विश्वकर्मा आदर्श समाज भूषण पुरस्कार असे एकूण 12 विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या 75 आदर्श व्यक्तींची निवड निवड समितीने केली आहे.  अशी माहिती यावेळी चंद्रकांत वेदपाठक यांनी दिली. या आदर्श कर्तृत्ववान सत्कारमूर्तींना स्मृतीचिन्ह,  सन्मान Draft,  मनाची शाल,  व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती  संत नरहरी प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष दीपक पोतदार यांनी दिली.  याच कार्यक्रमांमध्ये अक्कलकोट शहरातील गरीब व निराधार गरजू महिलांना साडीचोळी व धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती चंद्रकांत दादा वेदपाठक आणि सामाजिक मित्र मंडळाचे विद्यमान अध्यक्ष स्वामीनाथ हेगडे यांनी दिली आहे. 

यापूर्वी 13 नोव्हेंबर 2016 रोजी 51 आदर्श कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा व 51 गरीब निराधार महिलांना साडी चोळीवाटप व धान्य वाटप प्रतिष्ठान व मित्र मंडळाच्या वतीने यशस्वीपणे करण्यात आले होते.  तीच परंपरा पुन्हा आम्ही चालू ठेवत आहोत. तरी 19 नोव्हेंबर 2023  (रविवार)  अक्कलकोट  स्वामी समर्थांच्या नगरीत होणाऱ्या या सन्मान सोहळ्यास व विविध कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.  असे आवाहन विठ्ठल वेदपाठक सुरेश वेदपाठक आणि अनिल वेदपाठक यांनी केले आहे. 

या पत्रकार परिषदेत संतोष वगाले,  स्वामीनाथ पोतदार ,कल्लप्पा खेडगी,  अनिल पवार,  रवींद्र गोरे,  राहुल वेदपाठक,  आकाश वेदपाठक,  ओंकार वेदपाठक,  किरण वेदपाठक,  अशोक पोतदार,  विनोद पोतदार ,श्रीनिवास सिंदगीकर,  महेश सोनार, गुरपादप्पा हरवाळकर ,मुन्नाभाई मुजावर आणि चंद्रकांत हुंडेकरी आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments