Hot Posts

6/recent/ticker-posts

महर्षी प्रशालेचा बास्केटबॉल संघ विभागीय स्पर्धेसाठी रवाना

 महर्षी प्रशालेचा बास्केटबॉल संघ विभागीय स्पर्धेसाठी रवाना


अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर चा १७ वर्षाखालील मुलींचा बास्केट बॉल संघ विभागीय स्पर्धेसाठी रवाना झाला आहे.

शंकरनगर येथील महर्षी प्रशालेच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने सोलापुर येथील जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेतेपद मिळवुन संघाची विभागीय स्पर्धेसाठ निवड झाली होती.त्यानुसार दि.१८ अक्टोंबर २०२३ दरम्यान अहमदनगर येथे होणाऱ्या विभागीय बास्केटबॉल स्पर्धे साठी महषिॅ प्रशालेचा १७ वर्ष वयोगटातील मुलींचा बास्केटबॉल संघ अहमदनगर कडे रवाना झाला आहे.त्यांना स्पर्धेसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे मागदर्शन जयसिंह मोहिते पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील संचालिका स्वरुपाराणी  मोहिते पाटील,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील,सर्व संचालक स्थानिक प्रशाला समिती सभापती नितीन खराडे,सर्व संचालक,मुख्याध्यापक,संजय गळीतकर, पर्यवेक्षक एकतपूरे,सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर यांनी शुभेच्छा दिल्या संघाचे बास्केटबॉल कोच अनिल जाधव,क्रीडा शिक्षक एक बी मोहिते,मनोज सरवदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments