सातोली येथे साखळी उपोषण सुरू आजुबाजुच्या गावातुन मोठा पाठिंबा
माढा (कटूसत्य वृत्त):- सातोली येथील छत्रपती शिवाजी चौक ज्योतिबा मंदिर या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण व सर्व राजकीय नेते आणि पुढारी यांना गावबंदी चा ठराव सातोली गावचे सरपंच मनोहर कदम यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते सहमत करण्यात आला. यावेळी गावातील सर्व नागरिकांनी या ठरवाला पाठिंबा दर्शवला आहे.तसेच मनोज जारंगे पाटिल यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी 28.10. 2023 पासून साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला सातोली गावातील तसेच आजूबाजूच्या गावातून मोठा पाठिंबा मिळत आहे.मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्यासाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात साखळी उपोषण सुरू आहे
0 Comments