मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी रेल्वे अडवून रेल्वे
रुळावर टायर जाळून तीव्र निषेध..! "
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी रेल्वे अडवून रेल्वे रुळावर टायर जाळून तीव्र निषेध व्यक्त केला. गेल्या 15 दिवसात 10 समाज बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले आहे. आणि आजपर्यंत मराठा सामाजातील ५० बांधवांनी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले. असुन मराठा समाजातील बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण दिली असुन समाज बांधवांनो आत्महत्या न करता मराठा आरक्षणाचा लढा मोठ्या प्रमाणात उभा करा. सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला ओ.बी .शी प्रवर्गातून ५०% आरक्षण द्यावे आणि समस्त मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. अन्यथा येणाऱ्या काळात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सत्ताधारी आमदार खासदार व विरोधी पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. त्यांच्या अंगावरील कपडे फाडून नग्न करू अजूनही वेळ गेली नाही मराठ्यांच्या युवकांचा अंत पाहू नका परिणाम गंभीर होतील असे मनोगत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राम भैय्या जाधव यांनी व्यक्त केले.
मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राम भैय्या जाधव, मारुती सुरवसे, निशांत सावळे ,श्रीनिकेत सुरवसे आदी समाज बांधव उपस्थित होत
0 Comments